Breaking

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

श्री गणपती फार्मसीची तिरंगा रॅली उत्साहात



श्री गणपती फार्मसीची तिरंगा रॅली उत्साहात




 
   अकोले (खुर्द) प्रतिनिधी. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून श्री गणपती फार्मसी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची टेंभुर्णीमध्ये भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीचे उद्घाटन  टेंभुर्णी पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक धनाजी ओमासे सर यांनी केले. 
या तिरंगा रॅलीस विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला व रॅली उत्साहात संपन्न झाली. भारत देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संपूर्ण देशात विविध उपक्रम
राबवन्यात येत आहेत. हर घर तिरंगा, हर घर झेंडा या अभियाना अंतर्गत नागरिकांमध्ये, विद्यार्थ्यांमध्ये जागृती प्रसार व प्रचार करून सर्वांनी घरावर, कार्यालयावर तिरंगा झेंडा फडकवावा हा संदेश देणे, तसेच विविध सामाजिक सेवा उपक्रमांची माहिती व प्रसार करणे हा या रॅलीचा उद्देश होता. देशभक्तीपर घोषणा देत रॅलीने संपूर्ण गाव पिंजून काढले. तिरंगा झेंडा, संदेश फलक, शिस्तीत घोषणा देत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या रांगेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले .बी.फार्मसी प्रथम व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्य व देशभक्ती आणि तिरंग्याचे महत्व या विषयावर प्रबोधन पर पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिंकली. यावेळी संस्थेचे सचिव डॉ. आर. डी. बेंदगुडे अध्यक्ष ॲड. विजयराव हिरवे,उपाध्यक्ष बाबा येडगे,प्राचार्या डॉ. रूपाली बेंदगुडे ,महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. सुकुमार लांडे, प्रा. प्रशांत मिसाळ ,प्रा.शिवराज ढगे,प्रा. दिव्या ओस्तवाल, प्रा. प्राची पुराणिक ,इतर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा