Breaking

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

पवारवाडीत सांस्कृतिक कार्यक्रमाने अमृत महोत्सव साजरा



पवारवाडीत सांस्कृतिक कार्यक्रमाने अमृत महोत्सव साजरा



वडूज प्रतिनिधी / शरद कदम

            स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पवारवाडी ( दरूज ) ता. खटाव येथील प्राथमिक शाळा व अंगणवाडीमध्येही विविध कार्यक्रमाबरोबरच गुणवंत विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला. प्रारंभी शालेय समितीचे अध्यक्ष विठठल पवार यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी सोसायटीचे चेअरमन अंकुश पवार, सोसायटीच्या संचालिका बाळूताई कट्टे, मुख्याध्यापिका संगिता सजगणे, अनिल कुलकर्णी सर, अंगणवाडीसेविका नंदिनी पाटेकर, प्रकाश पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
           स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने शाळेच्या परिसरात वृक्षारोपन करण्यात आले. तर शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सांस्कृतिक कार्यक्रमाबरोबर विद्यार्थ्याची भाषणे, वेशभूषा, नाटीका, देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली. अंगणवाडी सेविका नंदिनी पाटेकर यांनी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ ' हे देशभक्तीपर गीत सादर केले त्या गीतास सोसायटीचे चेअरमन अंकुश पवार यांनी हार्मोनियमची साथ दिली. यावेळी शाळेतील गुणवंत विद्यार्थी व शिक्षकांचाही सत्कार ग्रामस्थांच्यावतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मदतनीस लता पाटेकर यांनी केले. तर कार्यक्रमास चंद्रकांत पवार, भानुदास पवार, अशोक पवार, जालिंदर पवार, राजेंद्र पवार, किरण पवार, मनोहर पवार, वैभव पवार, चंद्रकांत कट्टे, सुनिल पवार आदिसह ग्रामस्थ उपस्थित होते.

फाटो -
पवारवाडी ( दरूज ) : येथील प्राथमिक शाळेत ध्वजारोहन करताना विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा