आंतरराष्ट्रीय मानवाधिकार जिल्हा जनसंपर्क अधिकारी पदी - महेश तांबवेकर
डॉ विश्वजित आपगे यांचे हस्ते नियुक्ती पत्र प्रदान
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
सातारा जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी म्हूणून पत्रकार महेश तांबवेकर यांची आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजीक न्याय आयोगामार्फत नुकतीच नियुक्ती करण्यात आली. हे नियुक्ती पत्र महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष डॉ विश्वजित आपगे यांचे हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी डॉ संतोष डांगे सातारा जिल्ह्या कार्यकारी अध्यक्ष उपस्थित होते
पत्रकारितेच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य तसेच राष्ट्रीय टी व्ही न्यूज चॅनेनला केले कार्य तसेच स्वतः चे न्यूज पोर्टल न्यूज चॅनेल या माध्यमातून करत असलेले कार्य या सर्व सामाजिक कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाने त्यांना सातारा जिल्ह्याचे जनसंपर्क अधिकारी पदाची जबाबदारी दिली आहे
या त्यांच्या नियुक्ती बद्दल पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अमरदिप आपगे, वाद निवारण अधिकारी के एम पाटील, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षा स्नेहल थोरात , उपाध्यक्ष सुशांत सुर्यवंशी , खटाव तालुका सचिव बाबासाहेब कुंभार आदि सह मायणी परिसरातील व खटाव तालुक्यातील विविध मान्यवरांकडून अभिनंदन होत आहे.
फोटो
मायणी - महेश तांबवेकर यांना नियुक्ती पत्र देताना डॉ विश्वजित आपगे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा