सुळेवाडी येथील प्रा महादेव इरकर यांना मुंबई विदयापिठाची पि एच डी
पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस-
माळशिरस तालुक्यातील सुळेवाडी येथील व सध्या वस ई येथील उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय येथे कार्यरत असलेल्या प्रा महादेव दिनकर इरकर यांना मुंबई विदयापिठाकडुन विदयावाचस्पती (पिएचडी ) पदवी प्रदान करण्यात आली. त्यांनी माणदेशी मेंढपाळ धनगर जमातीच्या लोकसाहीत्याचा चिकीत्सक अभ्यास या विषयावर संशोधन केले आहे. प्रा महादेव इरकर हे बारा -तेरा वर्षाचे असताना वडीलांनचे छत्र हरपले. त्यानंतर ते वस ई येथे माती काम करून पदवी, बीएड,एम एड चे शिक्षण पूर्ण केले. प्रा महादेव इरकर हे सध्या वस ई येथील विदयालय वा.ठाकूर चँरिटेबल ट्रस्ट च्या उत्कर्ष कनिष्ठ महाविदयायलात मराठी विषयाचे अध्यापनाचे काम करीत आहेत. त्यांचा शैक्षणिक प्रवास अत्यंत खडतर परिस्थितीतुन झाला असुन त्यांनी रोजंदारी काम केले आहे. काही काळ प्रवास माती काम केले आहे. त्यांना मिळालेली पदवी ही कष्ट आणि मेहनतीतुन मिळाली आहे. त्यांचा संशोधनाचा विषय एक आव्हानात्मक विषय असल्यामुळे मोठी भटकंती करावी लागली. मेंढपाळ धनगर यांच्या मध्ये शिक्षणाचे प्रमाण अतिशय कमी असल्यामुळे साहित्य लेखनाचा अभाव आहे. त्यांना संशोधनात्मक माहीती गोळा करण्यासाठी माणदेश फिरावा लागला. या परीसरातील सणसमारंभ,यात्रा,जत्रा, उत्सव या प्रसंगी भेटी दयाव्या लागल्या त्यामुळे विषयाला न्याय देता आला.प्रा इरकर यांनी अपार मेहनत घेऊन केलेल्या या संशोधनातुन धनगर समाजातील नामशेष होण्याच्या मार्गावर असलेले लोकसाहित्य जतन करण्यासाठी उपयोग होईल अशी अपेक्षा आहे. प्रा महादेव इरकर यांच्या या पदवीबददल,सुळेवाडी, झिंजेवस्ती ,पिलीव परीसरातील शैक्षणिक, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यांच्या कडुन अभिनंदन व कौतुक होत आहे. फोटो -प्रा महादेव इरकर


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा