मारतळा येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी ईंग्लिश स्कूल मध्ये शिवसेना पक्षप्रमुख ऊद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस फळे वाटून साजरा
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
लोहा - येथील ज्ञानेश्वरी प्रायमरी ईंग्लिश स्कूल मध्ये शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री ऊद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस फळे वाटून साजरा करण्यात आला. या प्रसंगी उपस्थित मान्यवरांमध्ये
शिवसेना तालूकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल, शिवसेना मा. तालूकाप्रमुख संजय पाटील ढाले, सिडकोतील जेष्ठ शिवसैनिक साहेबराव मामिलवाड, किसान सेना तालूकाप्रमुख चंद्रकांत पाटील आडगावकर, निवृत्तीमामा जिंकलवाड, प्रमोद मैड, महिला आघाडीच्या निकीता शाहापुरवाड, संतोष पाटील वडवळे, जितुसिंह टाक, ब्रिजलाल उगिले, साईनाथ माळेगावे, पप्पू गायकवाड इत्यादी मान्यवर व शिवसैनिक उपस्थित होते.
वरील मान्यवर शिवसैनिकांच्या हस्ते व शिक्षकवृंदाच्या हस्ते ज्ञानेश्वरी प्रायमरी ईंग्लिश स्कूल मधील सर्व विद्यार्थ्यांना फळे वाटून शिवसेना पक्षप्रमुख व माजी मुख्यमंत्री ऊद्धव साहेब ठाकरे यांचा वाढदिवस शिवसेनेचे माजी उपजिल्हाप्रमुख संजय पाटील ढेपे यांच्या वतीने साजरा करण्यात आला. प्रारंभी प्रास्तविक संजय पाटील यांनी करून ऊद्धव साहेब ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सह, कोरोनाच्या भयंकर काळात महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख म्हणून महाराष्ट्रातील जनतेला आरोग्य सेवा तत्पर पुरऊन तसेच 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' मोहीम राबऊन मोठा दिलासा देत इतर राज्याच्या तुलनेत चांगली कामगीरी बजावली त्याबद्दल महाराष्ट्रातील तमाम जनता त्यांचे हे कार्य कधीच विसरणार नाही असे सांगितले. या प्रसंगी साहेबराव मामिलवाड यांनीही ऊद्धव ठाकरे यांच्या कार्याचा गौरवपुर्ण उल्लेख केला. या प्रसंगी शाळेतील शिक्षक विलास गोणारे, श्रीराम ढेपे, पुरूषोत्तम जोशी, प्रकाश तारू यांच्यासह कान्होपाञा तिरमाले, प्रिया सामला, शिवपुजा शिकारे, चांगुणा भरकडे, रूपाली कुलकर्णी, स्वाती कपाळे, कावेरी वाघमारे, नम्रता वाघमारे, संजीवनी साखरे शिक्षिकांसह विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा