आरोग्य कर्मचारी महासंघाचे कामबंद आंदोलन
किनवट प्रतिनिधी/बालाजी सिरसाट
किनवट : दि.२८-जुलै रोजी किनवट राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी महासंघ महाराष्ट्र राज्य व (भारतीय मजदूर संघ सलग्न ) यांनी पुकारलेल्या कामं आंदोलनामध्ये महासंघाची जिल्हा शाखा व किनवट तालुका शाखा सहभागी होत आहे असल्याबाबतचे निवेदन सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट तसेच तालुका आरोग्य अधिकारी किनवट उपजिल्हा रुग्णालय किनवट यांना देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभागाअंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियाना मध्ये कंत्राटी स्वरूपात कार्यरत असलेल्या विविध अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मंजूर होण्याकरिता मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांना निवेदन दिलेले आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी हे मागील पंधरा वर्षांपासून कार्यरत असून त्यांनी गरजू रुग्णांना आरोग्य सेवा पुरविलेली असून कोरोनाच्या महामारी मध्ये सुद्धा स्वतःचा आणि परिवाराचा विचार न करता रात्रंदिवस कोविड रुग्णांना आरोग्य सेवा दिलेली असून महाराष्ट्र राज्यास कोविडच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत.मागील पंधरा वर्षाच्या सेवेचा आणि कोविड कालावधीतील केलेल्या कामाचा आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी यांनी शासकीय नोकरीत लागण्याची कमाल वयोमर्यादा ओलांडलेली असल्याचा विचार करून महाराष्ट्र शासनाने आता तरी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी व कर्मचारी त्यांच्या परिवाराच्या भविष्याचा सकारात्मक निर्णय घेईल याकरिता राज्य महासंघाने दिनांक २८- जुलै रोजी कामबंद आंदोलन पुकारले आहे.
संघटनेच्या प्रमुख मागण्या :- १) राष्ट्रीय आरोग्य अभियानातील सेवेच्या कालावधीनुसार शैक्षणिक अह्तेच्या अनुषंगाने शासकीय सेवेमध्ये बिनशर्त समायोजन करणे ,२)सर्व कर्मचाऱ्यांचे समायोजन होईपर्यंत समान काम समान वेतन हे धोरण लागू करणे, ३) समान काम समान वेतन लागू होईपर्यंत मनुष्यबळ सुसूत्री करणांमध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियानातील जुन्या कर्मचाऱ्यावर अन्याय झालेला असून नवीन २०१६ मध्ये नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन अधिक झालेले असून जुन्या कर्मचाऱ्यांचे २००७ पासून २०१५ पर्यंत नोकरीला लागलेल्या कर्मचाऱ्यांचे मानधन कमी झालेले आहे.त्यामुळे जुन्या कर्मचाऱ्यांना ४० टक्के अतिरिक्त मानधन वाढ देऊन त्यांच्यावर झालेल्या अन्याय दूर करावा.
संपूर्ण देशामध्ये अमृत महोत्सवी वर्ष साजरे करण्यात येत आहे.त्यांचे औचित्य साधून तरी ह्या वर्षांमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत सकारात्मक निर्णय महाराष्ट्र शासन घेईल आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय देऊन खऱ्या अर्थाने त्यांना स्वातंत्र्याने जगण्याचा मार्ग मोकळा करेल अशी अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कंत्राटी कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा