Breaking

बुधवार, ८ जून, २०२२

ट्विंकल स्टार कॉलेज टेंभुर्णीचा याही वर्षी १००% निकालप्रथम - रविराज खटके, द्वितीय - गौरी गव्हाणे, तृतीय - शुभम मस्के



ट्विंकल स्टार कॉलेज टेंभुर्णीचा याही वर्षी १००% निकाल


प्रथम - रविराज खटके, द्वितीय - गौरी गव्हाणे, तृतीय - शुभम मस्के



टेंभुर्णी  प्रतिनिधी 
              श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय शिक्षण प्रसारक मंडळ टेंभुर्णी संचलित ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टेंभुर्णी या ज्यु कॉलेजचा इयत्ता बारावी सन २०२१ - २२ चा निकाल १००% टक्के लागला. त्याबद्दल संस्थेचे ज्येष्ठ मार्गदर्शक तथा शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष वैभव बाप्पू कुटे, सरपंच प्रमोद कुटे, रावसाहेब नाना देशमुख, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष सुभाष इंदलकर-पाटील, शिक्षक पालक संघाचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, परिवहन समितीचे अध्यक्ष समाधान मिस्कीन, उपाध्यक्ष धनंजय भोसले,संस्थेचे संस्थापक हरिश्‍चंद्र गाडेकर, प्रिन्सिपल रेखा गाडेकर ,सचिव अर्चना गाडेकर यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
              नुकत्याच लागलेल्या इयत्ता बारावीच्या निकालात कॉलेजमध्ये 81.67 टक्के गुण मिळवून रविराज शिवदास खटके हा प्रथम आला. 81. 17 टक्के गुण मिळवून गौरी संजय गवाने ही द्वितीय आली.तर 74 . 67 टक्के गुण मिळवून शुभम सूनील मस्के हा तृतीय आला आहे. या वर्षी एकूण 84 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्व विद्यार्थी चांगल्या मार्कांनी पास झाले. 81 विद्यार्थी 60 टक्‍क्‍यांपेक्षा अधिक गुण घेऊन उत्तीर्ण झाले. तीन विद्यार्थी द्वितीय श्रेणी मध्ये आले आहेत.
               इयत्ता बारावीची बॅच यशस्वी करण्यासाठी शिरसागर, रेखा गाडेकर,अर्चना गाडेकर, हरिश्‍चंद्र गाडेकर, रणजीत लोंढे,थोरात या  प्राध्यापकांनी परिश्रम घेतले. कॉलेजच्या पहिल्याच वर्षी म्हणजे गेल्या वर्षी 100% निकाल लागला होता.परंतु कोरोना कालावधीत परीक्षा ही अंतर्गत मूल्यमापनावर आधारित होती आणि यावर्षी बोर्डाच्या नियमाप्रमाणे परीक्षा झाल्यामुळे उत्कृष्ट निकाल लागला. प्रत्येक विद्यार्थ्यांचे मूल्यांकन उत्कृष्टपणे झाले. यावेळी विद्यार्थी व पालकांच्या चेहऱ्यावर आनंद ओसांडुन वाहताना दिसत होता. निकाल चांगला  लागल्याबद्दल पालकांनी शिक्षकांचे आभार व्यक्त केले.
 चौकट
यावर्षी निकाल चांगला लागला असून प्रत्येक विषयातील हायेस्ट चांगला आलेले आहेत. इंग्रजी - 80 ,मराठी - 81, गणित - 83, भौतिकशास्त्र - 92, रसायनशास्त्र - 94, जीवशास्त्र - 95, भूगोल- 89, ॲग्रीकल्चर सायन्स अँड टेक्नॉलॉजी- 99 अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात टॉपर्स गुण घेतलेले आहेत.
- हरिश्चंद्र पांडुरंग गाडेकर,
 प्राचार्य ,
ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टेंभुर्णी.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा