Breaking

गुरुवार, ९ जून, २०२२

वादळी वारे व पावसामुळे वडोली येथील गाडे कुटूंबाचे प्रचंड प्रमाणात नुकसान


वादळी वारे व पावसामुळे वडोली येथील गाडे कुटूंबाचे प्रचंड प्रमाणात नुकसान


भिमानगर प्रतिनिधी/ प्रदिप पाटील aj24taas news maharashtra



 माढा तालुक्यातील कोंढार भागातील वडोली येथील शेतकरी गाडे कुटूंबाचे बुधवारी आलेल्या जोरदार वादळीवाऱ्यासह पावसा मुळे मोठ्या प्रमाणात   केळी  पिक भुईसपाट झाल्याने हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.


.बूधवारी सायंकाळी आलेल्या पावसाने वडोलीतील गाडे कुटूंब शेतात केळीचे अचानक आलेल्या जोरदार वादळीवाऱ्यासह पावसाने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले व उभे सोन्यासारखे पिक मितीमोल झाले या संकटाने गाडे कुटूंबातील तानाजी विठ्ठल गाडे दोन हेक्टर लागन,गहिनीनाथ मच्छिंद्र गाडे दोन हेक्टर लागन,संध्या गहिनीनाथ गाडे दोन हेक्टर लागन,विलास महादेव गाडे तीन हेक्टर लागन व खोडवा,अरूण महादेव गाडे दोन हेक्टर खोडवा, विकास महादेव गाडे साडेतीन हेक्टर खोडवा, युवराज तांबवे साडेतीन हेक्टर खोडवा, सतिश काळे तीन एकर खोडवा, दत्तात्रय कवडे एक हेक्टर लागन असे एकंदर 62 ते 63 एकर केळी एकंदरीत महिनाभरात काढायला आलेली असताना निसर्गाच्या या अवक्रुपेमुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.

आज केळी दर 20 किलो असून कधी नव्हे तेवढा दर सद्यस्थिती आला होता.एकरी पाच लाख उत्पन्न धरले तर तीन कोटींच्या आसपास उत्पन्न मिळणार होते परंतु अचानक आलेल्या या अस्मानी सुलतानी संकटामुळे या शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे महसूल विभागाने तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे

चौकट

आमचे केळी मुख्य पिक असून शेतात हमेशा केळीचे उत्पादन घेतले जाते परंतू एवढ्या मोठ्या प्रमाणात नुकसान या अगोदर कधीही झाले नाही तरी शासनाने त्वरित पंचनामे करून भरपाई द्यावी
तानाजी विठ्ठल गाडे पाटील
वडोली ता.माढा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा