Breaking

शनिवार, २५ जून, २०२२

टेंभुर्णी मध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये टिंकल स्टार ची समृद्धी इंदलकर प्रथम.


टेंभुर्णी मध्ये घेण्यात आलेल्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये टिंकल स्टार ची समृद्धी इंदलकर प्रथम.



द्वितीय रयतेची वैष्णवी नाळे तर तृतीय शारदेय स्कूलची विजयालक्ष्मी गायकवाड.  

टेंभुर्णी  ( प्रतिनिधी)

    टेंभुर्णी येथील रावसाहेबनाना देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रावसाहेब नाना मित्र परिवाराच्या वतीने भव्य वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. मार्च 2022 मध्ये इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचाही सत्कार समारंभ यावेळी करण्यात आला. शाल, श्रीफळ, फेटा, पेन व गुलाब पुष्प असे सत्काराचे स्वरूप होते.

            या कार्यक्रमाची सुरुवात सरपंच प्रमोद कुठे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. वक्तृत्त्व स्पर्धेमध्ये ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजची इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी समृद्धी सज्जन इंदलकर हिने प्रथम क्रमांक मिळविला. न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी इयत्ता आठवीतील विद्यार्थिनी वैष्णवी नागनाथ नाळे हिने द्वितीय क्रमांक मिळवला. तृतीय क्रमांक श्री शारदेय गुरुकुल पब्लिक स्कूलची विद्यार्थिनी विजयालक्ष्मी हनुमंत गायकवाड व वैष्णवी मनोज सोनटक्के न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी या विद्यार्थ्यांनी विभागून तृतीय क्रमांक मिळविला. मुक्ता सचिन ढगे न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी हिने चतुर्थ क्रमांक मिळविला अजित पोपट शिंदे न्यू इंग्लिश स्कूल तसेच शंभवी अंकुश वाडेवाले न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी यांचा पाचवा विभागून क्रमांक आला आहे. स्पर्धेसाठी एकूण 40 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता चाळीस पैकी 35 विद्यार्थिनी व पाच विद्यार्थी होते यावरून मुली कुठेही मागे नाहीत हे दिसून येते या स्पर्धेसाठी न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी ट्विंकल स्टार इंग्लिश मेडियम स्कूल टेंभुर्णी जनता विद्यालय टेंभुर्णी संत रोहिदास आश्रम शाळा टेंभुर्णी श्री शारदीय गुरुकुल विद्यालय टेंभुर्णी या शाळेमधून स्पर्धकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला.


             सदर स्पर्धेसाठी सरपंच प्रमोद कुटे,गोरख बाप्पा देशमुख, ग्रामपंचायत सदस्य गणेश बापू केचे, शैलेश ओहोळ, विठ्ठल कोळपे, वैभव महाडिक, मा ग्रामपंचायत सदस्य सुरेश कुटे, शेवरेचे  विठ्ठल आबा मस्के, सापटणेचे अरुण ढवळे, स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, टायगर ग्रुपचे माढा तालुका अध्यक्ष लखन माने, रणजीत आटकळे, सुदर्शन पाटील, आप्पा हवलदार, लखन हवलदार, आकाश सुतार, मुकुंद सुतार,अँड. योगेश देशमुख, नाना भोसले, सचिन देशमुख,सुनील पोळ,राष्ट्रवादी महिला शहराध्यक्ष प्रा.सविता जगताप, ट्विंकल स्टारच्या प्रिन्सिपल रेखा गाडेकर, सचिवा अर्चना गाडेकर, नवनाथ नांगरे, आण्णासाहेब देशमुख, गौरव देशमुख, बाळासाहेब बारवे, गणेश लोकरे, दादा देवकर, सचिन वाघावकर, पप्पू देशमुख, नानासाहेब भोसले, नागेश पाणबुडे, संतिश मस्के, अमित देशमुख, आप्पा आटकळे,भैया देशमुख, सोमनाथ खरसांडे, हर्षल कासवेद नंदन गायकवाड, सुनील गायकवाड, प्रशांत गायकवाड, इत्यादी उपस्थित होते.
               स्पर्धेचे परिवेक्षक म्हणून महादेव पवार व पांडुरंग भगत यांनी काम पाहिले. स्पर्धा पार पाडण्यासाठी स्वराज्य ग्रुपचे अध्यक्ष प्रशांत देशमुख, गणेश बापू केचे, शैलेश ओहोळ, टिंकल स्टारचे संस्थापक हरिश्चंद्र गाडेकर,अप्पा हवलदार, भाऊसाहेब देशमुख, सोमनाथ खरसाडे, अमित देशमुख इत्यादी ने विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाची प्रस्तावना गणेश बापू केचे यांनी केली सूत्रसंचालन राजू पाटील व महादेव पवार यांनी केले उपस्थितांचे आभार हरिश्चंद्र गाडेकर यांनी मानले.

चौकट
मार्च 2022 मध्ये झालेल्या इयत्ता दहावी व बारावी परीक्षेमध्ये प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जनता विद्यालय टेंभुर्णी, ट्विंकल स्टार इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज टेंभुर्णी, न्यू इंग्लिश स्कूल टेंभूर्णी, कन्या प्रशाला टेंभूर्णी, जय तुळजाभवानी आश्रम शाळा टेंभुर्णी, महात्मा फुले विद्यालय टेंभुर्णी इत्यादी शाळेमधून प्रथम तीन क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा