Breaking

शनिवार, २५ जून, २०२२

करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्ष पदी ॲड. विकास जरांडे, तर उपाध्यक्ष पदी ॲड. प्रमोद जाधव


करमाळा वकील संघटनेच्या अध्यक्ष पदी ॲड. विकास जरांडे, तर उपाध्यक्ष पदी ॲड. प्रमोद जाधव



करमाळा /प्रतिनिधी 

करमाळा वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. विकास जरांडे तर उपाध्यक्षपदी ॲड.प्रमोद जाधव यांची बिनविरोध निवड झाली आहे. करमाळा वकील संघाची बैठक वकील संघाच्या कार्यालयात झाली. त्यावेळी सर्व पदाधिकारी निवड बिनविरोध करण्यात आली आहे. त्यानुसार सचिव म्हणून ॲड.योगेश शिंपी यांची पुन्हशः निवड झाली तर ॲड. विनोद चौधरी यांची सहसचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. तर ग्रंथालय अधिभार ॲड.पी.के.पवार यांची निवड करण्यात आली आहे. या सर्वांचे अभिनंदन न्यायाधीश एखे मॅडम व न्यायाधीश शिवरात्रे साहेब यांनी केले आहे.यावेळी कार्यक्रम सुत्रसंचालन ॲड.अजित विघ्ने यांनी केले तर आभार ॲड. जाधव यांनी मानले. यावेळी वकील संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा