*महाराणी आहिल्याबाई होळकर यांची जयंती मुस्लीम बांधवांकडून साजरी*
करमाळा दि. ३१ प्रतिनिधी
करमाळा मुस्लीम समाजाच्या वतीने महाराणी आहिल्याबाई होळकर यांच्या २९७ व्या जयंतीचे औचित्यसाधून त्यांच्या प्रतिमेस बहुजन विकास संस्थेचे अध्यक्ष इसाक पठाण, राष्ट्रीय मुस्लीम मोर्चाचे अध्यक्ष कय्युम शेख, युसुफ शेख सर यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले.
करमाळा मुस्लीम समजाच्या वतीने सर्व बहुजन महापुरुषांची जयंती साजरी करून त्यांच्या कार्याची माहिती सामाज बांधवाना देऊन युवकांमध्ये त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन समाजात परिवर्तन घडवून सामाजिक एकता आणि अखंडता, बंदुभाव निर्मान करण्याचा प्रयत्न मुस्लीम समाज बांधव करीत आहे. याचे इतरांनी अनुकरण करण्यासारखे आहे.
यावेळी जावेद मणेरी, दस्तगीर पठाण, राजू हमीद शेख, हाके सर, अजीम मोगल, बबलू पठाण, अमीन बेग, जमीर मुलाणी, गुलाम सय्यद, राजू सय्यद, अकबर सय्यद, अश्रफ तांबोळी, अमीर अहमद शेख, राजू कुरेशी, बशीर आतार, शाहरुख नालबंद, तोफिक शेख, अमीर मोमीन आदीजण उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा