*श्री तुळजा भवानी मातेचे कुलधर्म-कुलाचार टिकले पाहिजे .....अमरराजे कदम (अध्यक्ष भोपे पुजारी मंडळ तुळजापूर)*
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद
तुळजापूर :- आज दि २५-०५-२०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहात १)"देऊळ कवायत कायदा" व २) "देविचे कुलधर्म कुलाचार"
यासह मंदिरातील अनेक संधिग्द विषयीबाबत पत्रकार परिषद श्री तुळजा भवानी भोपे पुजारी मंडळातर्फे घेण्यात आली. तत्कालीन निजाम सरकारने इ.स.१९०९ साली मंदिर प्रशासनासाठी बनविलेली देवूळ कवायत नियमावलीचा आता चुकीचा अर्थ सोयीस्कररित्या काढून मंदिर संस्थान शेकडो वर्षापासून चालत आलेल्या रूढीपरंपरा,देविभक्तांचे कुलधर्म कुलाचार बंद करत आहे.शिर्डी,शेगाव व पंढरपूरच्या भक्तिपिठाप्रमाणे शक्तिपिठ आई तुळजा भवानी मंदिरचा कारभार एकसमान होवू शकत नाही.आई तुळजा भवानी माता ही कुलदेवता असल्याने इथे येणारा भाविक भक्त आपला कुलाचार कुलधर्म करण्यासाठी येत असतो. तो कुलधर्म कुलाचार योग्यपद्धतीने झालाच पाहिजे याची सर्वस्वी जबाबदारी ही मंदिर संस्थानची आहे.असे असताना देवूळ कवायत कलम ३६ चा चुकीचा अर्थ लावून सर्व धार्मिक विधी बंद करून केवळ व्यावसायीकपणा पाहिला जात आहे.यात भक्तांनी देविला नेसविण्यासाठी आणलेली साडी न नेसविणे,देवघरातील मुर्तीची देवभेट न करणे,माळपरडीचा कुलाचार न करून देणे,आराध बसलेले कुटुंब व चाकरी करणारी मंडळींना देविचे दर्शन न देणे,चरणतीर्थ व प्रक्षाळपुजा मध्ये स्थानिक लोकांना देविचे दर्शन न देणे असे अनेक कुलाचार धार्मिक विधित मोठ्याप्रमाणात मंदिर संस्थानचा हस्तक्षेप होत आहे. देवूळ कवायत मध्ये ५६ कलमांचा समावेश असून यात कलम १३,४८,४९,५३ व ५४ याकडे मंदिर संस्थान जाणूनबुजून डोळेझाक करत आहे.या कलमात मंदिर संस्थानने जुन्या रूढीपरंपरा जपल्या पाहिजे त्या मोडीत काढल्या जावू नये,शासन आदेश किंवा कोर्टाचा आदेश आल्या शिवाय जुन्या रूढीपरंपरा मोडल्या जावू नये असे असताना मुद्दामहून केवळ चुकीचा अर्थ काढून कलम ३६ चा हवाला देवून छत्रपती संभाजीराजे यांना मागील आठवड्यात देविदर्शनास पुर्वीप्रमाणे गाभा-यात जाण्यापासून वंचित ठेवले गेले या घटनेचा भोपे पुजारी मंडळातर्फे मंदिर संस्थानचा जाहिर निषेध भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम यांनी यावेळी पत्रकार परिषदेत केला आहे.या पत्रकार परिषदेत *कार्याध्यक्ष संजय सोंजी,सचिन परमेश्वर,दिनेश परमेश्वर,अतुल मलबा,सचिन पाटिल,प्रशांत सोंजी,कैलास पाटिल,विकास मलबा,शशीकांत परमेश्वर,सार्थक मलबा,संकेत पाटिल,विनोद सोंजी हजर होते.*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा