Breaking

मंगळवार, १७ मे, २०२२

उजनीच्या पाणी प्रश्नावर शिंदे बंधुचे मौन का? : पंचायत समितीचे माजी उपसभापती पै.दत्तात्रय सरडे यांचा सवाल




उजनीच्या पाणी प्रश्नावर शिंदे बंधुचे मौन का? : पंचायत समितीचे माजी उपसभापती पै.दत्तात्रय सरडे यांचा सवाल


करमाळा प्रतिनिधी/ AJ 24Taas News

************************************
सोलापूर जिल्ह्यातील महत्वाच्या उजनीच्या पाणी प्रश्नावर दोन्ही आमदार शिंदे बंधुचे मौन कशासाठी त्यांचे गप्प रहाणे म्हणजे मुकसंमती समजायची का? यांनी मीठ खाल्लय का? असा जाहीर सवाल करमाळा पंचायत समितीचे माजी उपसभापती करमाळा तालुक्यातील पच्छिम भागातील नेते पैलवान दत्तात्रय सरडे यांनी केला आहे. उजनी धरणासाठी सर्वाधिक त्याग करणारा करमाळा तालुका तहानलेला असताना उजनी धरणातील पाणी इंदापूर तालुक्याला देण्याचा घाट घातला जात आहे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आपल्या पदाचा वापर करून या योजनेसाठी आर्थिक तरतूद करून घेण्यात यशस्वी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातून या निर्णयाला विरोध होत असताना जिल्ह्यातील ज्या तालुक्यांना तुलनेत कमी अधीक लाभ मिळतो अशा तालुक्यातून लोकप्रतिनिधी शेतकरी  विरोध करत आहेत.जिल्हायात या प्रश्नावर आंदोलने होत असताना उजनीच्या काठावर असणाऱ्या करमाळा माढा तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार शिंदे बंधूंनी मात्र यासंदर्भात मौन पाळले आहे याचा अर्थ सामान्य लोकांनी काय समजायचा सत्तेच्या नादात आमदार बंधूंना सामान्यांच्या प्रश्नांचा विसर पडलाय का संपूर्ण जिल्ह्यातून यासंदर्भात विविध पक्ष संघटनेच्या माध्यमातून आंदोलने सुरू आहेत परंतु या प्रश्नावर विधानसभेत आवाज उठवणे महत्त्वाचे आहे तो आवाज शिंदे बंधूंनी उठवणे अपेक्षित असताना या प्रश्नावर सोयीस्करपणे मौन बाळगणेच त्यांनी पसंत केले आहे यामागे काय गौडबंगाल आहे याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यातून होत असून आपल्या राजकीय फायद्यासाठी मतदार संघातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे काम शिंदे बंधुकडून होत असल्याचे प्रतिपादन सरडे यांनी केले आहे यासंदर्भात गट पक्ष बाजूला सारून सर्वांनी एकत्र येऊन विरोध करण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा