Breaking

बुधवार, ४ मे, २०२२

मंगरूळ प्राथमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावतीने विध्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस वितरण**


*मंगरूळ प्राथमिक शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्यावतीने विध्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस वितरण**



**जिल्ह्यातील हा पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम**

प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


 तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी पहिला मेळावा बुधवार १३ एप्रिल रोजी  संपन्न झाला होता त्यामेळाव्यात शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा  पत्रकार चांदसाहेब शेख व उपाध्यक्ष भीमसेन हजारे यांच्या वतीने १५ एप्रिल ते १ मे दरम्यान इयत्ता पहिली ते चौथी वर्गातील १००% उपस्थिती दर्शवणाऱ्या विध्यार्थ्यांना प्रोत्साहनपर शालेय साहित्य देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु सर्वच विध्यार्थ्यांना शाळेची गोडी निर्माण व्हावी व या माध्यमातून  विध्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शाळेतील सर्वच १३४ विध्यार्थ्यांना १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून बक्षिसाचे वितरण करण्यात आले हा जिल्ह्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम 
   
         या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून मंगरूळचे युवा पोलीस पाटील लक्ष्मण माळी तर  अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष तथा पत्रकार चांदसाहेब शेख  होते तसेच यावेळी शालेय समिती उपाध्यक्ष भीमसेन हजारे  ग्रामपंचायत सदस्य सौ. गरगडे ताई व शिक्षणप्रेमी नागरिक सुभाष पाचपुनडे  हे आवर्जून होते         
          यावेळी मुख्याध्यापक डोलारे सर  , हेरकर मॅडम , राठोड मॅडम , येरटे मॅडम , कुलकर्णी सर  यांनी उपस्थित विध्यार्थ्यांना  मार्गदर्शन  केले 
 
 इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गातील  १३४ विद्यार्थी यांना  पाटी , पेन्सिल , वही , पेन , पेन्सिल , खोडरबर , शॉपनर , पॅड यासह अनेक प्रकारचे शैक्षणिक साहित्य अतिशय सुंदर , नियोजनबद्ध व अतिशय आनंददायी वातावरणात  वाटप करण्यात आले सर्वच विध्यार्थ्यांना शालेय साहित्य मिळाल्याने विध्यार्थीही भारावून गेले होते असा हा जिल्ह्यातील पहिलाच नाविन्यपूर्ण उपक्रम मंगरूळ प्राथमिक ( मुलांच्या ) शालेय समितीने राबविल्याने शिक्षणप्रेमी नागरिक व पालकांतुन तसेच  शिक्षकातून आभार व अभिनंदन व्यक्त केले जात आहे असाच उपक्रम इतरही शालेय समितीने राबवावा व विद्यार्थ्यांच्या जडणघडणीकडे विशेष लक्ष केंद्रित करावे अशी अपेक्षा शैक्षणिक जाणकार यांच्याकडून व्यक्त केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा