प्रधानमंत्री गरीब कल्याण अंत्योदय योजनेंतर्गत,
अन्नधान्य वितरण परिमाणात माहे मे 2022 पासून बदल.
प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.
उस्मानाबाद,दि.11, प्रधानमंत्री गरीबकल्याण अन्न योजनेअंतर्गत लक्ष्य निर्धारित सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील पात्र लाभार्थ्यांना माहे एप्रिल 2020 पासून राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्यव्यतिरिक्त प्रतिसदस्य प्रतिमाह 5 किलो अन्न धान्य मोफत वितरीत करण्यात येत होते. त्यामध्ये अंत्योदय योजनेंतर्गत प्रती व्यक्ती परिमाण गहु 3 किलो आणि तांदुळ 2 किलो तसेच प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत प्रती व्यक्ती गहु 3 किलो आणि तांदुळ 2 किलो याप्रमाणे वितरीत करण्यात येत होते.
दि.05 मे 2022 च्या शासन आदेशान्वये माहे मे 2022 ते सप्टेंबर 2022 करिता राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत अनुज्ञेय असलेल्या अन्नधान्याव्यतिरिक्त प्रतिसदस्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत प्रतिमहा 5 किलो अन्नधान्य मोफत वितरीत करण्यात येत आहे. त्यामध्ये यापूर्वी असलेल्या धान्याच्या परिमाणात बदल करुन अंत्योदय योजने अंतर्गत प्रती व्यक्ती गहु 2 किलो आणि तांदुळ 3 किलो तसेच प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत प्रती व्यक्ती गहु 1 किलो आणि तांदुळ 4 किलो या प्रमाणे वितरीत करण्यात येणार आहे, असे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी कळविले आहे


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा