Breaking

सोमवार, ७ मार्च, २०२२

बेंबळे येथील गीता पाठशाळेत शिवरात्री महोत्सव आनंद व उत्साहाने संपन्न.....



बेंबळे येथील गीता पाठशाळेत शिवरात्री महोत्सव आनंद व उत्साहाने संपन्न.....

बेंबळे ।प्रतिनिधी।                     फोटो

            बेंबळे येथील प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या गीता पाठशाळेत शिवरात्री महोत्सव उत्साहाने संपन्न करण्यात आला, प्रमुख अतिथी म्हणून टेम्भूर्णी केंद्राच्या प्रमुख अनिता बेहेनजी, सायली बेहेन डॉ. ए एस पावले, हेमलता पावले विलास चव्हाण, कुलकर्णीभाई, नारायण लोंढे गुरुजी आदी मान्यवर उपस्थित होते.
       सर्वप्रथम अनिताबेहेनजी व मान्यवरांच्या हस्ते शिवध्वजारोहण करण्यात आले. यानंतर बेंबळे गीता पाठशाळेच्या मुख्य संचालिका वैजयंती बेहेन यांनी सर्वांचे स्वागत करून, लाँकडाउन नंतर दोन वर्षांनी हा कार्यक्रम होत असल्याबद्दल आनंद व्यक्त केला. डॉ.ए एस पावले याप्रसंगी म्हणाले की सध्याच्या युगातील अशांत परिस्थिती व अस्थिर समाज जीवनामध्ये शांती, सुख ,समाधान प्राप्त करण्यासाठी, राजयोगाच्या अभ्यासाद्वारे परमात्म्याचे ज्ञान आत्मसात करून आत्मा व परमात्मा यांच्या मधील दृढ संबंधा विषयी सखोल ज्ञान मिळवणे काळाची गरज आहे. अनिता बेहेनजी यांनी ज्ञान, योग, धारणा, सेवा, अमृतवेला व मुरली याविषयी सखोल विवेचन केले


. हेमलता पावले यांनीही आपले मनोगत व्यक्त करून बेंबळे गीता पाठशाळेला 28 वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन करून धन्यवाद व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संजीवनी कदम, भारती भोसले, प्रतिभा भोसले, साधना भोसले, सुलभा कुळकर्णी, शैलजा रामदासी, तेजश्री भोसले, गौरव कुलकर्णी, निवृत्ती कदम ,भाऊसाहेब कुलकर्णी आदी मान्यवरांनी  विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संचालिका वैजयंती  कुलकर्णी  यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा