टेंभुर्णी : - पेनूर येथील ग्रामसेवक पी.डी. निर्मळे यास सोलापूर येथील जिल्हा न्यायाधीश श्रीमती यु.एल.जोशी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.या खटल्यात आरोपीतर्फे ॲड दयानंद नानासाहेब पाटील टेंभुर्णी यांनी युक्तिवाद केला होता.
आरोपी हा ग्रामसेवक असून फिर्यादी ह्या ग्रामपंचायत शिपाई आहेत.आरोपीस या खोट्या गुन्ह्यात गुंतविलेले आहे.ही बाब ॲडव्हान्स न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेवक यांच्यात असलेल्या मतभिन्नतेमुळे खोटा गुन्हा दाखल केलेला आहे.हा ॲड दयानंद पाटील यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी ग्रामसेवक पी.डी.निर्मळे यांचा जिल्हा न्यायाधीश सोलापूर श्रीमती यु.एल.जोशी यांनी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा