*नळदुर्ग येथे मराठी भाषा दिन उत्साहात साजरा*
प्रतिनिधी:- अजित चव्हाण
*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन,ग्रंथ पूजन,व मराठी भाषा प्रतिज्ञेचे वाचन,पत्रकार बांधवाचा सत्कार आदि कार्यक्रमाचे आयोजन*
नळदुर्ग-येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मराठी राजभाषा दिन व कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्म दिनानिमित्त प्रतिमेचे पूजन,ग्रंथ पूजन,मराठी भाषा प्रतिज्ञेचे सामूहिक वाचन,व तसेच मराठी पत्रकार बांधवाचा सत्कार आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते,प्रारंभी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे व ग्रंथाचे पूजन पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे व पत्रकार संघाचे सचिव सुनील गव्हाने मनसेचे जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी यांच्या हस्ते पूजन करण्यात आले,त्यानंतर मराठी भाषा प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन करण्यात आले,त्यानंतर शहरातील सर्व पत्रकार बांधवाचा सत्कार करण्यात आला,यावेळी जेष्ठ पत्रकार विलास येडगे,पत्रकार संघाचे अध्यक्ष सुहास येडगे,तानाजी जाधव,दादासाहेब बनसोडे, शिवाजी नाईक,डॉ.प्रा.दिपक जगदाळे, सुनील गव्हाणे,अजित चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती,यावेळी जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,जनहित कक्ष व विधी विभाग ता.अध्यक्ष अॅड.मतीन बाडेवाले, शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, शहर संघटक रवि राठोड,मनविसे शहर सचिव आवेज इनामदार, आदि उपस्थित होते,कार्यक्रमाचे आयोजन जिल्हाध्यक्ष प्रशांत नवगिरे यांच्या मार्गदर्शनाख़ाली मनविसे शहराध्यक्ष सूरज चव्हाण यांनी केले,तर सूत्रसंचालन,प्रास्ताविक प्रमोद कुलकर्णी यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा