कन्हेरगावात ऑनलाईन सर्व्हर चालेना रेशन कार्डधारक त्रस्त
कन्हेरगाव (प्रतिनिधी) AJ 24 Taas News Maharashtra
सार्वजनिक वितरण प्रणाली अंतर्गत मशीन द्वारे रेशन कार्डधारकांना धान्याचे वाटप सध्या देशभरात चालू असून गेले 8 दिवसांपासून ऑनलाईन सर्व्हर बंद असल्याने माहे फेब्रुवारी महिन्याचे नियमीत व मोफत धान्य वाटप वितरण करण्यास अडचण येत असुन या अडचणी मुळे मात्र रेशन कार्ड धारक सकाळपासून संध्याकाळपर्यंत रांगेत नुसते उभे राहत आहेत.
दिवसभरात दहा ते पंधरा जणांना धान्याचे वाटप होत असून बाकीच्या लोकांना संध्याकाळी रिकाम्या हाती परत जावे लागत आहे.याचा राग मात्र रेशन कार्ड धारक रेशन दुकानदारांवर काढत असून फेब्रुवारी महिन्यातील धान्य वाटपाचे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. रेशन दुकानदार सुद्धा त्रस्त झालेले आहेत.रेशन कार्ड धारक दुकानदाराशी हुज्जत घालताना,भांडण करताना दिसत आहेत.याकडे मात्र धान्य पुरवठा अधिकारी यांनी लक्ष घालून ऑनलाइन सर्व्हर व्यवस्थित चालू करण्याची मागणी रेशनधारक व दुकानदार करताना दिसून येत आहेत. रेशन दुकानदार लोक सुद्धा मात्र सकाळपासून संध्याकाळपर्यंत दहा ते पंधरा जणांना देण्यासाठी दिवसभर दुकानात बसून आहेत. लवकरात लवकर ऑनलाइन सर्व चालू करण्याची मागणी रेशन दुकानदार करीत आहेत.
चौकट-
मी गेल्या चार दिवसांपासून रोज रेशन दुकानात माल आणण्यासाठी जात आहे.पण माझा नंबर येत नाही.आम्हाला ऑनलाईन सर्व्हर कसलं काही कळत नाही.तरी प्रशासनाने आम्हाला धान्य पुरवठा सुरळीत होण्यासाठी लक्ष घालून ऑफलाइन पद्धतीने धान्य देण्यासाठी प्रयत्न करावेत...
साखरबाई ठोंबरे, रेशनकार्ड धारक कन्हेरगाव ता.माढा


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा