Breaking

मंगळवार, १५ फेब्रुवारी, २०२२

तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच,आज २००,ते २२५, अतिक्रमणे नगरपरिषदेच्या पथकाने हटवले*



*तुळजापूर नगरपरिषदेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरूच,आज २००,ते २२५, अतिक्रमणे नगरपरिषदेच्या पथकाने हटवले*


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद.


तुळजापूर नगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण मोहीम सातत्याने राबवण्यात येत असून,  आज दिनांक 14-02-2022 रोजी सदर मोहीम भवानी रोड, महाद्वार समोरून खडकाळ गल्ली विभागात राबविण्यात आली. यावेळी साधारण 200 ते 225 ईतकी अतिक्रमणे नगरपरिषदेच्या पथकांनी हटवली.  सदर अतिक्रमण मोहिमेमुळे मंदिर परिसर मोकळा झाल्यामुळे नागरिक भाविक व पुजारी बांधवांनी मोकळा श्वास घेतला असून नगरपरिषदेच्या सातत्याने चालू असलेले अतिक्रमण कारवाई बाबत समाधान व्यक्त केले आहे.  सदर अतिक्रमण मोहीम कार्यवाहीची पहाणी मुख्याधिकारी श्री.हरीकल्याण येलगटे यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली.  सदर मोहीम यशस्वी करण्यासाठी कार्यालय अधीक्षक श्री. वैभव पाठक, कर निरीक्षक श्री.रणजीत कांबळे,श्री दत्ता साळुंके स्वच्छता निरीक्षक,नगर अभियंता प्रशांत चव्हाण, नगर अभियंता अविनाश काटकर, गुणवंत कदम, विश्वास मोटे,  राजाभाऊ सातपुते यासह इतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला व सदर मोहीम यशस्वी केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा