Breaking

सोमवार, २८ फेब्रुवारी, २०२२

जिल्हा परिषद केंद्र शाळा पिलिव च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी ॲड वैभव मेथवडे तर उपाध्यक्ष पदी सौ मंदा लोंढे यांची बिनविरोध निवड.



जिल्हा परिषद केंद्र शाळा पिलिव च्या शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष पदी ॲड वैभव मेथवडे तर उपाध्यक्ष पदी सौ मंदा लोंढे यांची बिनविरोध निवड.


पिलीव प्रतिनिधी प्रमोद भैस

  माळशिरस तालुक्यातील पिलिव येथील जिल्हा परिषद केंद्र शाळे च्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष पदी ॲड वैभव मेथवडे यांची तर उपाध्यक्ष पदी सौ मंदा लोंढे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली.आज जिल्हा परिषद केंद्र शाळेतील सर्व पालकांची नूतन व्यवस्थापन समिती निवडीसाठी माजी अध्यक्ष प्रशांत महामुनी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी नूतन सदस्य पदी शाम उपाध्ये , प्रशांत गांधी , जगजितसिंग रजपूत , समीर तांबोळी , सौ माधुरी गोंजरी , सौ राधिका कुंभार , सौ रोहिणी बिडे ,सौ अश्विनी बोडरे , सौ सारिका जामदार ,शिक्षण तज्ञ म्हणून पत्रकार अभिजित तावरे यांच्या निवडी करण्यात आल्या . सदर निवडी प्रसंगी शाळेच्या मुख्यद्यापिका सौ गोटे व
 सर्व शिक्षक स्टाफ व केंद्र प्रमुख राजकुमार फासे व सर्व पालक वर्ग यांच्या सह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते . नंतर सर्व नवनिर्वाचित सर्व पदाधिकऱ्यांचा सत्कार ही करण्यात आला. निवडी नंतर नूतन अध्यक्ष ॲड वैभव मेथवडे यांनी जसे मागील व्यवस्थापन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जसे शाळा सुंदर शाळा स्वच्छ शाळा ह्या उपक्रम अंतर्गत आपल्या शाळेचे नाव उज्वल केले तसेच आम्ही ही अजून आपल्या शाळेचे नाव कसे उज्वल होईल असे आम्ही प्रयत्न करू असे यांनी सांगितले .  
     तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा सत्कार माजी सभापती जिल्हा परिषद सोलापूर संग्रामसिंह जहागीरदार यांच्या हस्ते पुष्पहार व श्रीफळ देऊन करण्यात आला

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा