*लेखक/प्रकाशक श्री,अरूण जाखडे यांचे दु:खद निधन
_________________
पद्मगंधा प्रकाशन,पुणे चे प्रकाशक,नामवंत व अनेक पुरस्कार प्राप्त लेखक मा.श्री.अरूण जाखडे सर यांचे आज दु:खद निधन झाले.एक ऋषितुल्य,मनमिळाऊव्यक्तिमत्त्व अनंतात विलीन झाले.माझा व त्यांचा संबंध जीवनाचा उपासक-कर्मवीर लाेहाेकरे या चरित्रग्रंथाच्या निमित्ताने आला.त्यांनीच हे पुस्तक प्रकाशित केले.ऑक्टोबर-२०२१मध्ये प्रकाशनाचा कार्यक्रम झाला.त्यावेळी ते आवर्जून उपस्थित होते.त्यांचे माध्यमिक शिक्षण श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,गाैडगाव,ता.बार्शी,या संस्थेत मल्टी पर्पज आदर्श न्यु.इंग्लिश माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर याठिकाणी झाले होते. जाखडे हे एक हुशार,हरहुन्नरी विद्यार्थी म्हणून कर्मवीर लाेहाेकरे गुरूजींनी त्यांनाच नव्हे तर त्यांच्या कुटुंबालाही आधार दिला.म्हणून या चरित्रग्रंथाचे काम त्यांनी अगदी आस्थेने केले.या पुस्तकात जाखडे सरांनी सांगितलेला गुरूजी व त्यांच्या संबंधित एक प्रसंगही समाविष्ट करण्यात आला.प्रकाशनाच्या वेळी मा.सुशीलकुमारजी शिंदे साहेबांनी आपल्या मनाेगतात या प्रसंगाचा आवर्जून उल्लेख केला. आमचे तर ते मित्रच झाले होते.पाठीमागील चार दिवसापूर्वी त्यांची माझी फाेनवर चर्चा झाली हाेती.अगदी मनमाेकळ्या गप्पा झाल्या.उदगीर साहित्य संमेललनाविषयी विस्तृत चर्चा झाली.तसेच आणखी पुस्तके तेच करणार हाेते.पण आज ही दु:खद बातमी कळाली अन् मानसिक धक्काच बसला.
अशा या जिंन्दा दिल व्यक्तिमत्वाला आमच्या श्री.शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ,गाैडगाव ता.बार्शी चे अध्यक्ष- श्री.विनायकराव गरड,सचिव-श्री.पंडितराव लाेहाेकरे,इतर संचालक मंडळ,शिक्षक,शिक्षकेत्तर कर्मचारी त्यांना भावपूर्ण श्रध्दांजली वाहत आहाेत.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो हीच प्रार्थना-----!
🌹भावपूर्ण श्रध्दांजली🌹
शोकाकुल
1) मल्टी पर्पज आदर्श न्यु.इंग्लिश माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय गौडगांव ता.बार्शी.जि.सोलापूर
2) कर्मविर भाऊराव पाटील विद्यालय चिखर्डे, ता.बार्शी.
3) लोकसेवा विद्यालय श्रीपत पिंपरी,ता.बार्शी.जि.सोलापूर
4) रामगिरी विद्यालय जवळगांव ता.बार्शी.जि.सोलापूर.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा