*तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने शहरात अतिक्रमण हटाव मोहीमेस सुरुवात, मुख्य रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास*
*AJ 24 Taas News-प्रतिनिधी रुपेश/ डोलारे उस्मानाबाद
शहरात अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली असून, यामुळे मंदिरातून बाहेर पडण्याचा मातंगी मंदिर समोरील मार्गासह मंदिर आणि शहरातील प्रमुख रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. दिवसभर चाललेल्या अतिक्रमण विरोधी मोहिमेत शहरातील तब्बल २०० छोट्या मोठ्या अतिक्रमणावर पालिकेने जेसीबी चालवला.
पालिकेचे प्रशासक उपविभागीय अधिकारी योगेश खरमाटे यांच्या नेतृत्वाखाली पालिकेचे प्रभारी मुख्याधिकारी हरीकल्याण येलगट्टे यांनी सोमवार (दि. २४) शहरात अतिक्रमण विरोधी मोहीम राबवली. शहरातील कमानवेस भागातील अहिल्याबाई होळकर विहिरी, पासून अतिक्रमण विरोधी मोहीमेला प्रारंभ करण्यात आला. यावेळी महाद्वार रोड, मातंगी मंदिर समोरील रस्ता,महाद्वार परिसरातील अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. अतिक्रमण विरोधी मोहीम मंगळवार (दि. २५) सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान पालिकेचा कारवाईत सातत्य ठेवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.यावेळी पालिकेचे कार्यालयीन अधिक्षक वैभव पाठक, अभियंता अशोक सनगले, स्वच्छता निरीक्षक दत्ता साळुंके, राहुल मिटकरी, महादेव सोनार आदी पालिकेचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अतिक्रमण हटाव मोहीम मध्ये
एक जेसीबी,२ ट्रॅक्टर व एका टमटम सह पालिकेचे तब्बल १०० कर्मचारी अतिक्रमण विरोधी मोहिमेत सहभागी झाले होते. यावेळी तगडा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी महाद्वार रोड, मंदिर परिसरा सह भवानी रोड वरील तब्बल २०० छोटी मोठी अतिक्रमणे हटविण्यात आल्या ने शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा