Breaking

शनिवार, २५ डिसेंबर, २०२१

चव्हाणवाडी सोसायटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीसमोर भाजपचे तगडे आव्हान**दोन राजकीय गटासमोर नव्याने तयार झालेल्या भा.ज.प.गटाचे असणार तगडं आव्हान*



*चव्हाणवाडी सोसायटीच्या निवडणूकीत राष्ट्रवादीसमोर भाजपचे तगडे आव्हान*


*दोन राजकीय गटासमोर नव्याने तयार झालेल्या भा.ज.प.गटाचे असणार तगडं आव्हान*


टेंभुर्णी प्रतिनिधी/अमोल भोसले aj 24taas news Maharashtra


माढा तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या चव्हाणवाडी टें येथील चव्हाणवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीचा कार्यक्रम पुढील महिन्यात जाहीर होत असल्याने एैन गुलाबी थंडीच्या दिवसात गावातील राजकीय वातावरण  तापू लागले आहे.
चव्हाणवाडी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीची मुदत जून २०२१ मध्ये संपली आहे.
करोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून स्थगित असलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका सहा टप्प्यात घेतल्या जाणार आहेत. त्यामध्ये साखर कारखाने, पतसंस्था, नागरी सहकारी बँका, सहकारी सूतगिरण्या, सहकारी दुग्ध संस्था, कृषी पतसंस्था आणि बहुउद्देशीय सहकारी संस्थांचा समावेश आहे. प्रलंबित निवडणुकांची प्रक्रिया ३१ मार्च २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश प्राधिकरणाचे अध्यक्ष जगदीश पाटील यांनी दिले आहेत.
चव्हाणवाडी सोसायटीच्या २०१६-२०२१ या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये १३ जागेपैकी कै रघुनाथ आबा चव्हाण यांच्या पॅनलने अशोक मिस्कीन यांच्या पॅनलचा पराजय करत ७ जागा जिंकून सत्ता मिळवली होती तर अशोक मिस्कीन यांच्या पॅनेलला ६ जागा मिळाल्याने पराभवाला सामोरे जावे लागले होते.
२०११ च्या सोसायटी निवडणुकीत कै रघुनाथ आबा चव्हाण व अशोक मिस्किन यांच्या पॅनेलचे समान संचालक निवडून आले होते मात्र कै रघुनाथ आबांचे नातेवाईक तत्कालीन संचालक नवनाथ नांगरे सर हे चेअरमन करण्याच्या शब्दावर अशोक मिस्कीन यांच्या गटात सामील झाल्याने मिस्कीन गटाने सत्ता स्थापन केली ह्या २०११ च्या निवडणुकीचा अपवाद वगळता सोसायटीच्या स्थापनेपासून कै रघुनाथ आबा चव्हाण यांच्या गटाचे सोसायटीवर कायम निर्विवाद वर्चस्व राहिल्याने गावातील राजकारणात रघुनाथ आबांच्या गटाचा दबदबा राहिल्याचा दिसून येतो.
माढा तालुक्याचे आमदार बबनरावजी शिंदे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे अशोक मिस्कीन त्यांच्या गटाची सलग पंधरा वर्षापासून ग्रामपंचायतीवर एकहाती सत्ता आहे.
आमदार बबनदादा शिंदे यांचे अत्यंत जवळचे विश्वासू समर्थक असल्याने टेंभुर्णी पंचायत समितीचे उमेदवार म्हणूनही पार्टी प्रमुख अशोक मिस्कीन यांच्याकडे पाहिले जात आहे.
मध्यंतरीच्या कालावधीत कै रघुनाथ आबांच्या निधनानंतर त्यांचे बंधू तंटामुक्त अध्यक्ष अरुण चव्हाण हे पार्टीचे नेतृत्व करत आहेत.
कै रघुनाथ आबांच्या निधनानंतर गावच्या राजकारणात बर्‍यापैकी पोकळी निर्माण झाली असतानाच सध्याचे चेअरमन सुभाष इंदलकर व मा.चेअरमन  राहुल चव्हाण यांनी कै रघुनाथ आबांच्या पार्टीला सावरण्याचा प्रयत्न केला.
राजकीय हेवेदावे विसरून गतवर्षी झालेली ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्यादृष्टीने माजी चेअरमन राहुल चव्हाण यांनी प्रयत्न केले होते परंतु ऐन वेळी दोन्ही पार्टीने त्यांची उमेदवारी देण्याऐवजी त्यांच्या पत्नी उमेदवारी जाहीर केल्याने त्या कारणावरून त्यांनी बिनविरोध करण्यास विरोध केला तसेच दोन्ही पार्टी एकत्र येऊन बिनविरोध करण्याच्या उद्देशाने मिस्कीन व चव्हाण यांच्या गटांमध्ये तीन-चार सदस्य व अडीच अडीच वर्ष असा फॉर्म्युला ठरला.
मात्र दोन्हीं पार्ट्यानी एकत्रित येऊन ठरविलेला फॉर्मुला अयोग्य असल्याने तसेच मतदारांचे जनमत पाहता चव्हाण पार्टीने स्वतंत्र लढावे या मुद्द्यावर ही भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष सुभाष इंदलकर व सोसायटीचे माजी चेअरमन राहुल चव्हाण यांनी अपक्ष अर्ज भरून दोन्ही गट एकत्रित आलेल्या पॅनल विरुद्ध तगडे आव्हान उभे केले होते.
झालेल्या निकालात भाजपचे सुभाष इंदलकर यांच्या पत्नी अपक्ष उमेदवार सौ ज्योती इंदलकर यांनी मिस्कीन व चव्हाण यांच्या गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला तसेच अपक्ष उमेदवार सोसायटीचे माजी चेअरमन राहुल चव्हाण यांनीही ग्रामपंचायत निवडणुकीत आश्चर्यकारक मतं मिळवली.
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीपासून अनपेक्षीतपणे घडलेल्या घडामोडींमुळे पूर्ण राजकीय समीकरणे बदलली असल्याने येऊ घातलेल्या सोसायटी निवडणुकीमध्येही मिस्कीन व चव्हाण गट एकत्रित येऊन आमदार बबनराव शिंदे व रणजितसिंह शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.
असे असताना दुसरीकडे या पाच वर्षात सोसायटीचा चेहरामोहरा बदलून सोसायटीला एका प्रगतीच्या उंचीवर ठेवणारे विद्यमान चेअरमन सुभाष इंदलकर व माजी चेअरमन राहुल चव्हाण यांनीही स्वतंत्र पॅनल उभा करण्याची जोरदार तयारी केली असल्याचे चित्र आहे.
गतवर्षी झालेल्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अपक्ष असतानाही सुभाष इंदलकर व राहुल चव्हाण यांनी एकूण मतदानाच्या जवळपास निम्मी मतं मिळवत मतदारांचा विश्वास संपादन केला असल्याने याच जोरावर तसेच या पाच वर्षाच्या कालावधीत सोसायटीमध्ये पारदर्शकपणे काम करत असताना जिल्हा बँकेत एक कोटीची मुदत ठेव करण्यात आली असून ८१ पात्र सभासद शेतकऱ्यांना नव्याने सभासद करून जुन्या-नवीन अशा १८५ सभासदांना १ कोटी ८६ लाख रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले आहे.
तसेच सभासद शेतकऱ्यांच्या शेअर्स रकमेवर झालेल्या नफ्यातून प्रत्येक वर्षी १२ टक्के प्रमाणे लाभांशचे वाटप करण्यात आले असून अशी अनेक कामे गावची आर्थिक नाडी असलेल्या सोसायटीच्या माध्यमातून केली असल्याने याच कामाच्या जोरावर याची पोहोच पावती मिळेल या विश्वासाने माजी पालकमंत्री आमदार विजयकुमार देशमुख, भाजपा जिल्हा संघटक सरचिटणीस धैर्यशील भैय्या मोहिते पाटील व भारतीय जनता पार्टीचे माढा तालुकाध्यक्ष योगेश बाबा बोबडे यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल उभा राहणार असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे मिस्कीन व चव्हाण गट तसेच नव्याने तयार होत असलेल्या सुभाष इंदलकर व राहुल चव्हाण यांच्या पॅनेल कडून उमेदवारांची चाचपणी सुरू झाल्याने एकमेकांसमोर तगडे आव्हान असणार असल्याने सोसायटीची निवडणूक चुरशीची होणार असल्याची चर्चा गावांमध्ये सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा