Breaking

शनिवार, ११ डिसेंबर, २०२१

सहाय्यक आयुक्त हराळे यांनी परिते केंद्राची व शाळेची केली शैक्षणिक गुणवत्ता तपासणी


 सहाय्यक आयुक्त  हराळे  यांनी परिते केंद्राची व शाळेची केली शैक्षणिक गुणवत्ता तपासणी


टेंभुर्णी /प्रतिनिधी
  पुणे विभाग, पुणे यांचे तपासणी पथक जिल्हा परिषद प्राथमिक केंद्रशाळा, परिते या ठिकाणी तपासणीसाठी आले असता, सदर तपासणी पथकामध्ये  हराळे  सहाय्यक आयुक्त पुणे विभाग , पुणे,  पोपट कुंभार   घारे होते.
 सर्वप्रथम तपासणी पथकातील सर्व अधिकारी यांचा शाल, फेटा, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. 
        तपासणी पथकाने केंद्रप्रमुख व मुख्याध्यापक जि. प. प्रा  शा. परिते यांचे दप्तर तपासणी केले. त्यामध्ये शालेय पोषण आहाराचे सर्व रेकॉर्ड व स्वयंपाकी यांचे मानधन, हजेरी पत्रक,किरकोळ रजा रजिस्टर, जड वस्तू संग्रह नमुना नंबर 32, मोफत साहित्य प्राप्त रजिस्टर, हलचाल रजिस्टर, उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर, ग्रंथालय देवघेव रजिस्टर, शालेय व्यवस्थापन समिती मिटींग नोंदवही, आवक- जावक रजिस्टर, धनादेश वाटप रजिस्टर, केंद्रप्रमुख हालचाल नोंदवही, सर्व शिक्षा अभियान रोजकिर्द, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना रजिस्टर, सादिल खर्च नोंदवही, रोकड वही, सर्वशिक्षा अभियान कॅशबुक, धनादेश प्राप्त नोंदवही व परिसर स्वच्छता आदी सर्व बाबींची इत्यंभूत तपासणी केली असता. वर नमूद सर्व बाबींवर *आयुक्त  हराळे  यांनी समाधान व्यक्त केले असून विद्यार्थी गुणवत्ता तपासले असता शालेय विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेबाबत ही अतिशय आनंद व समाधान व्यक्त केले.तसेच शालेय तपासणी मध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या वर्गखोल्या अतिशय सुंदर व स्वच्छ असून पूर्णपणे डिजीटल क्लासरुम आहेत, असे नोंद केली व सुरू असलेल्या कृतीयुक्त अध्ययन - अध्यापन प्रक्रिया बाबत पूर्णपणे समाधान व्यक्त केले. परिते केंद्राच्या व शाळेच्या  शैक्षणिक कार्याचे कौतुक करून भविष्यातील त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.*
   आयुक्त तपासणीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी पूर्ण करण्यासाठी *मारुती फडके  गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती कुर्डुवाडी,  बंडू शिंदे  विस्तार अधिकारी यांचे मार्गदर्शन मिळाले.*
   तसेच शाळेतील सहकारी *मुख्याध्यापक आदरणीय क्षिरसागर सर, दिनकर शिंदे सर, शाम सावंत सर,  श्रीम जयश्री कोष्टी मॅडम, श्रीम शुभांगी देशमुख मॅडम, कोळी मॅडम यांचे सहकार्य लाभले.*
   तसेच *परिते केंद्रातील  शिक्षक आदरणीय सोमनाथ शेंडगे सर, श्री शरद गवळी सर, श्री शिवाजी सारूक सर* यांनीही खूप सहकार्य केले.
    तसेच *शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री नेताजी लांडे, उपाध्यक्ष मा श्री विपुल मेहता व सदस्य* यांचेही सहकार्य मिळाले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा