*महाराष्ट्राचे लोकनेते कै, गोपीनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त,तुळजापूर येथे शेतकरी संवाद मेळावा संपन्न*
देशाचे पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी साहेबांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी अभिनव योजना सुरू केल्या आहेत. शेतकऱ्यांना अशा योजनांची माहिती देण्यासाठी व मार्गदर्शन करण्यासाठी आज मा. आ. राणाजगजितसिंह दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
त्याच प्रमाणे महाराष्ट्राचे लोकनेते व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री कै. गोपिनाथजी मुंडे साहेब यांच्या जयंती निमित्त तुळजापूर विधानसभा मतदार संघातील शेतकरी बांधवांच्या उपस्थितीत मंगळवेढ्याचे लोकप्रिय आमदार मा. आ. श्री समाधानजी आवताडे यांचा तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मा. आ. सुजितसिंहजी ठाकुर साहेब व मा. आ. अभिमन्युजी पवार साहेब उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जिल्हाध्यक्ष मा. नितिनजी काळे, जिल्हाउपाध्यक्ष मा. दिपक दादा आलुरे, जिल्हाउपाध्यक्ष मा. विक्रम देशमुख, माजी जिल्हा परिषद सदस्य मा. गणेश सोनटक्के, तुळजापूर नगर परिषदेचे अध्यक्ष मा. सचिन भैय्या रोचकरी, तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मा. विजयकुमार गंगणे, तुळजापूर पंचायत समितीच्या सभापती मा. रेणुकाताई इंगोले, नगर परिषदेचे सन्माननीय नगरसेवक, शेतकरी बांधव व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा