अखेर जलसंपदा विभाग बांधकाम विभागाच्या वादत रखडलेल्या लोहगाव-नळदुर्ग रस्ता कामास सुरुवात
तुळजापूर तालुक्यातील लोहगाव-नळदुर्ग मार्गावरील रस्ता अनेक वर्षांपासून बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वादात रखडलेल्या रस्ताचा वाद मिटल्याने अखेर कामास सुरुवात करण्यात आली.
लोहगाव-नळदुर्ग मार्गावरील अलियाबाद ब्रिज ते रामतीर्थ देवस्थान पर्यतचा अंदाजे 700 मीटरचा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग आणि जलसंपदा विभागाच्या वादात गेल्या अनेक वर्षांपासून रखडला होता. त्यामुळे लोहगावसह परिसरातील नागरिकांना वाहनधारकांना नाहकच त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे पावसाळ्यात या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरून दुचाकी घसरून अपघातात वाढ झाली होती.
परिसरातील अनेक नागरिकांना या रस्ताच्या दूरवस्थेमुळे अपघात होऊन दुखापत झाली आहे. तरीही याकडे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांतून संताप व्यक्त होत होते. याची दखल घेऊन लोहगाव ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी संबंधित विभागांकडे पाठपुरावा करून रस्ता कामास सुरुवात करण्याची मागणी केली होती. कामास तात्काळ सुरुवात न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा संबंधित विभागाकडे निजाम शेख यांनी निवेदनाद्वारे दिली होती. याचीच दखल घेऊन दोन्ही विभागातील वाद मिटवून घेवून रखडलेल्या कामाच्या सुरुवात करण्यात आले असल्याचे माहिती ग्रामपंचायत सदस्य निजाम शेख यांनी दिली.
प्रतिनिधी अजित चव्हाण (नळदुर्ग)


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा