Breaking

रविवार, ५ डिसेंबर, २०२१

उस्मानाबाद जिल्हा संपर्क कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,व शेतकरी यांची पुढील आंदोलना संदर्भात जिल्हा बैठक घेण्यात आली*



*उस्मानाबाद जिल्हा संपर्क कार्यालयात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,व शेतकरी यांची पुढील आंदोलना संदर्भात जिल्हा बैठक घेण्यात आली*



आज दिनांक,०५ डिसेंबर २०२१,रोजी उस्मानाबाद जिल्हा संपर्क कार्यालयांमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व सर्व शेतकरी उपस्थित राहून खरीप हंगामातील पीक विमा या संदर्भामध्ये पुढील आंदोलनाची रणनीती ठरविण्यासाठी जिल्हा बैठक संपन्न झाली यामध्ये विमा कंपनीने तालुक्यातील तहसील मंडळातील पिक विमा वाटप न केल्यास उस्मानाबाद जिल्ह्यात सर्व ठिकाणी विमा कंपनी आणि तालुक्यातील विमा संदर्भातील अधिकारी शेतकर्‍यांची फसवणूक करून अहवाल तयार करून विमा कंपनीचा कोट्यवधी रुपयांचा फायदा केला आहे प्रत्यक्षात उस्मानाबाद जिल्ह्यातील विमा कंपनी या खरीप विमा संदर्भात केला पाहिजे होती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले असून प्रत्येक शेतकऱ्याने तक्रार देऊन सुद्धा त्याची कसलीही पाहणी न करता चुकीच्या पद्धतीने अहवाल केल्यामुळे शेतकऱ्यांना कमी पिक विमा मिळत आहे शासकीय आकडेवारीनुसार प्रत्येक मंडळातील ज्या पद्धतीने नुकसान झालेले आहे त्यानुसार त्या टक्केवारीत जर विमा कंपनीने नुकसानभरपाई न दिल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना सर्व जिल्ह्यात तीव्र आंदोलन करणार आहे. त्याच बरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रविंद्र इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली धनाजी पेंदे चंद्रकांत समुद्रे शशिकांत चव्हाण कमलाकर पवार उत्तरेश्वर आव्हाड सचिन पाटील विष्णू काळे पंकज पाटील कमलाकर पवार दयानंद भोसले श्रीकांत पाटील भोजने प्रदीप जगदाळे सचिन पाटील रामकृष्ण पाटील शहाजी सोमवंशी बाजीराव पाटील नेताजी जमदाडे उमेश जामदाडे गव्हाळ महादेव असे शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा