*श्री माऊली शिक्षण संस्थेत राष्ट्रीय गणित दिन व राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा*
टेंभुर्णी/प्रतिनिधी
:श्री माऊली शिक्षण प्रसारक व समाजसेवा मंडळ संचलित लक्ष्मी आनंद विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज,टेंभुर्णी(करमाळा रोड) येथे राष्ट्रीय गणित दिन व राष्ट्रीय शेतकरी दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात थोर गणितज्ञ श्रीनिवास रामानुजन व जगाचा पोशिंदा बळीराजा यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.यानंतर इयत्ता सहावी व सातवी वर्गातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर उपप्राचार्या शेवतेकर मॅडम व गणित विषय शिक्षक राहुल हागरे ,रंणजित औताडे यांनीही आपल्या भाषणामध्ये श्रीनिवास रामानुजन यांच्या शोधांविषयी अतिशय सोप्या भाषेत माहिती सांगितली.शहाणे मॅडम व प्रमोद ननवरे यांनी शेतकरी दिनाविषयी शेतकऱ्याच्या कष्टाविषयी व कार्याविषयी मनोगत व्यक्त केले.याबरोबरच पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचा गणित दिन व शेतकरी दिना संबंधित उपक्रम राबविण्यात आले. शेतकऱ्यांच्या कार्याविषयी माहिती सांगणे , संख्या मोजून चित्रे
चिटकवने व अडिशन मशीन तयार करून त्यात विद्यार्थ्यांकडून उदाहरणे सोडवून घेणे,नंबर गेम अशा प्रकारे हसत खेळत विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाची गोडी निर्माण करण्यात आली त्याचबरोबर उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट व चॉकलेट देऊन आभिनंदन करण्यात आले.इयत्ता आठवी, नववी, दहावी, व अकरावीच्या वर्गातील विद्यार्थिनींनी सुबक अशी गणिती सूत्रांची रांगोळी साकारली होती. अशा प्रकारे खूपच रोचक असा कार्यक्रम साजरा करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक प्रमोद ननवरे सर यांनी केले.
यावेळी उपस्थित असलेले मान्यवर संस्थेचे चेअरमन श्री योगेश बोबडे सर, सेक्रेटरी सौ. सुरजा मॅडम,प्राचार्या डॉ कीर्ती मॅडम, उपप्राचार्या शेवतेकर मॅडम ,खुळे सर, पठाण सर व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन खुळे सर यांनी केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा