*सरकारी यंत्रणेचा गैरवापर करणाऱ्या उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याबाबत,भाजपा युवा मोर्चाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन*
आज दिनांक,०८ डिसेंबर २०२१,रोजी उस्मानाबाद जिल्हाधिकारी यांना भाजपा युवा मोर्चाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी स्वतःच्या मुलाला युवक काँग्रेस निवडणुकीत निवडून आणण्यासाठी महावितरणच्या सरकारी यंत्रणेचा वापर करीत अधिकारी, कंत्राटदार यांच्यावर दबाव टाकला आहे.कंत्राटदार यांना पैशाचे आमिष दाखवून तसेच मुलासाठी काम न केल्यास भविष्यात अडचणी येतील असा दबाव आणून धमकावले जात आहे.राज्याच्या ऊर्जा खात्याचा बोजवारा उडालेला असताना ऊर्जामंत्री राज्याकडे लक्ष न देता संपूर्ण महावितरण यंत्रणा पुत्र प्रेमासाठी काँग्रेसच्या दावणीला बांधत आहे;हे योग्य नाही.सरकारी पदाचा गैरवापर केल्या प्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांचा त्वरित राजीनामा घ्यावा ही मागणी मुख्यमंत्री महोदयांकडे आपल्या माध्यमातून आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करीत आहोत.
सदर प्रकार अतिशय गंभीर असून अश्याच एका प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पूर्व प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांना पदापासून दूर व्हावे लागले होते. सदर विषयात ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्या राजीनाम्याविषयी त्वरित कार्यवाही संदर्भात विनंती आहे. सध्य परिस्थीतीत शेतक-यांच्या अडचणी महावितरण कर्मचा-यांच्या कारभारामुळे तसेच उर्जामंत्र्याच्या उदाशीन धोरणामुळे वाढ होत आहे. उर्जामंत्र्याचे हे कृत्य अत्यंत लाजीरवाने असून महाराष्ट्रातील तमाम जनतेच्या व शेतक-यांच्या भावना दुखावल्या जात आहेत. त्यामुळे नैतिकतेला धरुण श्री. नितीन राऊत यांनी राजीनामा द्यावा व मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर कार्यवाही करावी. अन्यथा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने राज्यभर उग्र आंदोलन छेडण्यात येईल.
यावेळे जिल्हाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा श्री. राजसिंहा राजेनिंबाळकर, अभय इंगळे, ओम नाईकवाडी, विशाल पाटील, सुरज शेरकर, गणेश एडके, राज निकम, प्रितम मुंडे, हिम्मत भोसले, मनोजसिंह ठाकूर, स्वप्निल नाईकवाडी, देवकन्या गाडे, पुजा राठोड, विद्या माने, प्रसाद मुंडें, ज्ञानेश्वर चव्हाण, प्रज्ञा परीट, आण्णासाहेब शिंदे, अजय उंबरे, अमरसिंह ढोबळे इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा