Breaking

गुरुवार, २३ डिसेंबर, २०२१

अबब वर्षांपूर्वी 10 हजार रुपयाला घेतलेले कालवड गेले तब्बल 95 हजार रूपयेलाप्रदीपराव पाटील /भिमानगर प्रतिनिधी



अबब वर्षांपूर्वी 10 हजार रुपयाला घेतलेले कालवड गेले तब्बल 95 हजार रूपयेला


प्रदीपराव पाटील /भिमानगर प्रतिनिधी

 झाले असे की उजनी टे तालुका माढा येथील किशोर आनंता शिरतोडे या शेतकऱ्यांनी एक वर्षांपूर्वी म्हणजेच 5 डिसेंबर 2020 ला बाजारातून होस्टन फ्रिजिशियन जातीचे संकरित पैलारू जर्सी कालवड दहा हजार रुपयाला विकत आणले होते व बेंबळे यथील पशुधन पर्यवेक्षक डॉ. प्रदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली किशोर शिरतोडे यांनी या जर्सी कालवडीची देखभाल केली बरोबर एका वर्षांनी 21 डिसेंबर 2021 रोजी गलांडवाडी नं.1 तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील व्यापारी संजय बापू हरणावळ या शेतकऱ्यांनी तब्बल 95 हजार रुपये मोजून या होस्टन फ्रिजिशियन जातीच्या कालवडीला खरेदी केली आहे.

चौकट

 यामुळे योग्य मार्गदर्शनाने शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून पशुधन व्यवसाय फायदेशीर ठरत आहे असे दिसते त्या होस्टेन फ्रिजीशीयन कालवडीला  वाजत गाजत निरोप देण्यात आला यावेळी किशोर शिरतोडे,सदाशिव शिरतोडे, कालिदास शिरतोडे व पशुधन पर्यवेक्षक डॉ. प्रदीप शिंदे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा