*महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संपाला वंचित बहुजन आघाडीचा जाहिर पाठिंबा*
तुळजापूर:- एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या मागण्या साठी उपोषणाला बसलेले आहेत त्यांना जाहीर पाठिंबा व त्यांची मागणी योग्य आहे ती शासनाने तात्काळ सोडवण्या बाबत, वरील विषयी आपल्या निदर्शनास आणून देत आहोत की एसटी महामंडळ कर्मचारी आपल्या न्याय व प्रलंबित मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला असून या संपास व मागण्यास वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष, बाळासाहेब तथा प्रकाशजी आंबेडकर यांनी पाठिंबा दर्शवला आहे त्याच अनुषंगाने तुळजापूर वंचित बहुजन आघाडी वतीने निवेदन करत आहे की
एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाल्यामुळे आत्तापर्यंत सुमारे 35 ते 40 कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत त्याचे एकमेव कारण हे त्यांच्या तुटपुंजा पगार व पगाराची अनियमितता आहे त्यामुळे एसटी महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांना राज्य शासनामध्ये विलीनीकरण करून त्यांची शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन निश्चिती करण्यात यावी आणि खालील मुद्द्यावर राज्य सरकार व एसटी प्रशासनाने गांभीर्यपूर्वक विचार करून एसटी कर्मचाऱ्यांना न्याय द्यावा.
एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण व्हावे.
आत्महत्या केलेल्या कुटुंबास न्याय मिळालाच पाहिजे.
कोरोणा मध्ये मयत झालेल्या कर्मचारी यांना 50 लाख आर्थिक मदत देण्यात यावी
एसटी कामगारांचे कोरोणा काळातील वैद्यकीय बीले प्रकरणे तातडीने मंजूर करावीत.
माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्या आदेशाने जी समिती सरकारने नेमलेले आहे त्यात निश्कलंक असे मा प्रवीणजी गेडाम मा तुकारामजी मुंडे अशा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात. यावी. अन्यथा युवक वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल . यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते मिलिंद रोकडे .बालाजी शिंगे. जीवन कदम .सुरज विटकर.कमलेश कदम . सुरेश मस्के.ज्ञानेश्वर बनसोडे.राकेश जेठिथोर.सुरेश चौधरी..
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा