जिल्हा दिव्यांग कल्याण,पुनर्वसन समिती....अशासकिय सदस्यपदी-राजू आनंदकर
श्रीगोंदा-नितीन रोही,
जिल्हा दिव्यांग व्यक्ती कल्याण व पुनर्वसन समितीच्या अशासकिय सदस्यपदी.राजू सोपान आनंदकर यांची शिवसेनेच्या कोठ्यातून तालूका प्रमुख बाळासाहेब दुतारे यांच्या शिफारसी नुसार निवड झाली.
या पदावर निवङ करण्यासाठी शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख भाऊ कोरगांवकर,जिल्हाप्रमुख शशीकांत गाङे यांनी तालूकाप्रमुख दुतारे यांना नाव सुचवण्याचे आदेश दिले होते त्या नुसार दुतारे यांनी सर्व सामान्य दिव्यांगांसाठी झटणारे राजू आनंदकर यांच्या नावाची शिफारस केली होती. आनंदकर यांना त्यांची शासकिय पदी निवङझाल्याचे लेखी पत्र मिळताच राजू आनंदकर यांनी बाळासाहेब दुतारे यांच्याशी त्वरीत संपर्क साधून शिवसेना संपर्क प्रमुख मा.भाऊ कोरगांवकर,जिल्हाप्रमुख मा.शशीकांत गाङे सर,तालूका प्रमुख मा.बाळासाहेब दुतारे ,शिवसेनेच्या सर्वच पदाधिकारी व शिवसैनिक,युवासैनिकांचे मनापासून आभार मानले आणि शिवसेना हा एकमेव असा पक्ष आहे कि ,जे सर्वसामान्य समाजसेवा करण्यासाठी धङपङत असणारे होतकरू तरूणांनी दखल घेवून त्यांना पदावर नियुक्ती करून काम करण्याची संधी देतो याचा प्रत्यक्ष पुरावा आणि अनुभव म्हणजे माझी निवङ हाच होय ,मी शिवसेनेने दिलेल्या संधीचे सोने करण्यासाठी जास्तीत जास्त दिव्यांग व्यक्तींना शासकिय मदत मिळवून देत त्यांना योग्य तो न्याय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त केला .तालूका प्रमुख दुतारे यांनी राजू आनंदकर यांचा भगवी शाल देवून सत्कार करीत शासकिय मदती पासून आज पर्यंत वंचित असणारे सर्व दिव्यांगाना शासकिय मदत मिळवून द्यावी असे ठाम सांगीतले .या वेळी तालूका उपप्रमुख मा.सुरेश देशमुख ,मा.युवासेना तालूका प्रमुख मा.हरिभाऊ काळे,युवासेना शहर उपप्रमुख मा.जयराज गोरे आणि अनेक शिवसैनिक उपस्थित होते.
फ़ोटो,


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा