Breaking

बुधवार, १७ नोव्हेंबर, २०२१

मुलांचा भविष्यकाळ घडवता आला तरच ... मुलांना जन्माला घाला - दिंगबर काळे आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेची सहविचार सभा संपन्न



मुलांचा भविष्यकाळ घडवता आला तरच ... मुलांना जन्माला घाला - दिंगबर काळे 

आदिवासी फासेपारधी कर्मचारी संघटनेची सहविचार सभा संपन्न


वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

       आदिवासी फासे पारधी समाजाची दिशा अजूनही स्पष्ट नाही, चुकीची कामे करू नका, चांगले उदिष्टे डोळ्यासमोर ठेवून भविष्यकाळ घडवून मानाने जगायला शिका व मुलांचा भविष्यकाळ घडवता आला तरच मुलांना जन्माला घाला असे मत दहिवडी ( ता. माण) येथील गारवा मंगल कार्यालयात आयोजित महाराष्ट्र राज्य आदिवासी पारधी समाजाच्या सहविचार सभेत समाजाचे पश्चिम महाराष्ट्र पुणे विभागीय अध्यक्ष दिंगबर काळे हे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. सहविचार सभेच्या अध्यक्षस्थानी मंगरूळ चव्हाळा प्रश्नचिन्ह आश्रम शाळेचे संस्थापक अध्यक्ष मतीन भोसले हे होते. यावेळी महासचिव सुरेश पवार, खजिनदार काश्मीर शिंदे, सहसचिव प्रदेश भोसले, सातारा जिल्हाध्यक्ष शैलेश भोसले, सोलापूर जिल्हाध्यक्ष बाळू भोसले, पुणे जिल्हाध्यक्ष नेकलेस भोसले, आदिवासी पारधी महिला आघाडीच्या राज्यध्यक्षा राणी शिंदे, पत्रकार शरदराव कदम, शेतकरी संघटनेचे माण तालुकाध्यक्ष राजु मुळीक, सरपंच रेश्मा शिंगाडे, सनम शिंदे, अॅड नितीन शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
          श्री काळे पुढे म्हणाले की, समाजातील तरुण वर्ग शिकला पाहीजे, संघटित झाला पाहीजे, समाजाची दिशा अजूनही स्पष्ट नाही, मुलांच्या शिक्षणांवर पैसे खर्च करून मुलांचा भविष्यकाळ घडवा. पारधी समाज एकसंघ नसून व्यसनाधीन होत चालेला आहे. त्यामुळे समाज बदनाम होत आहे. चुकीची कामे करू नका अशा शेलक्या शब्दात त्यांनी समाजाला मार्गदर्शन केले.
        अध्यक्षीय भाषणात मतीन भोसले म्हणाले पारधी सामाजाच्या माथी लागलेला चोरीचा कलंक पूर्णपणे पुसून काढून अधिवेशनाच्या माध्यमातून आदिवसी पारधी समाजाची संघटना मजबूत करून शासन दरबारी आपल्या व्यथा पारधी सामाजाला स्थान दया, भरतीमध्ये सामील करून घ्या, इतर गोष्टी मध्ये दिवसाढवळ्या चोऱ्या होतात मग पारधी समाजावरच चोरीचा कलंक का ?पारधी समाजाच्या विकास कामासंदर्भात किती बैठका घेतल्या? असे अनेक प्रश्न आपण संघटनेच्या माध्यमातून मांडून आपण आपले हक्क कायदयाच्या चौकटीतून सोडवून ताठ मानेने जीवन जगू या. यावेळी सुरेश पवार, उपदेश भोसले, शैलश भोसले, अक्षय भोसले आदिंनी मनोगते व्यक्त केली.
       यावेळी तेजस भोसले, कौस्तुभ काळे, मेनका भोसले, नंदिनी पवार, अमिषा पवार, शुभांगी शिंदे, किर्ती पवार, पूनम काळे, निलम काळे, डॉ.केशव काळे, भास्कर भोसले, अमोल भोसले, छकुल्या काळे, विश्वजित काळे, संतोष काळे, दशरथ शिंदे, उमेश काळे, विराज पवार, धीरज पवार, विक्रम पवार, दिपक पवार, छकुल्या पवार, सुदेश भोसले, रोहन भोसले, विजय काळे, प्रितम काळे, रोहन काळे आदिसह संघटनेचे पदाधिकारी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थित होते. संघटनेच्या व समाजाच्या वतीने जेष्ठ कार्यकर्ते अब्दूल शिंदे, काश्मिर शिंदे, राणी शिंदे यांचा विशेष सन्मान तर समाजातील यशस्वी गुणवंत विद्यार्थांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. प्रास्ताविक काश्मीर शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार जिनेश काळे यांनी मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा