*कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपला उर्जितावस्था प्राप्त करणारे सुपुत्र व रेल्वे वर्कशॉपचे मुख्य प्रबंधक संजय साळवे साहेबांच्या सोलापूरच्या बदली निमित्त निरोप*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*
*कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपला अत्याधुनिक उर्जितावस्था प्राप्त करून देणारे येथील सुपुत्र व रेल्वे वर्कशॉपचे मुख्य प्रबंधक,उप मुख्य यांत्रिक इंजिनिअर यांची सोलापूरच्या विभागीय रेल्वे कार्यालयात वरिष्ठ मंडल यांत्रिक इंजिनिअरपदी बदली झाल्याने त्यांना भावपूर्ण निरोप देण्यात आला.*
*कुर्डुवाडी शहराचे भूषण असलेल्या मध्य रेल्वे वर्कशॉप बंद पडते की काय अशी अवस्था झाली होती.नॅरोगेजसाठी असलेल्या या वर्कशॉपला नवीन कामाची जरुरी होती.*
*वर्कशॉपला १०० कोटी रुपयांची मंजुरी मिळाल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून कर्मचाऱ्यांच्या हाताला कामाचीही मोठ्या प्रमाणात गरज होती.*
*संजय साळवे साहेबांनी रेल्वे वर्कशॉपला मंजूर निधी उपलब्ध करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून नवीन कोचेसचे काम मिळवण्यासाठी विशेष प्रयत्न केले.*
*तसेच त्यांच्याच काळात रेल्वे वर्कशॉपमध्ये दोन मोठ्या प्रशासकीय इमारती,दोन मोठे शेड, कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या नवीन इमारती व यंत्रणा भव्य स्वरूपात उभ्या राहिल्या आहेत.*
*त्यांच्या काळात अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बनवलेल्या बोगीनी कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉप अन् कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ पातळीवर विशेष गौरवास पात्र ठरले.*
*त्यांच्या कामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कर्मचाऱ्यांना न दुखवता कामास प्रोत्साहित करणे.त्यांच्या दिर्घ काळच्या सेवेत कर्मचाऱ्यांला शास्ती लावली गेली नाही.*
*कुर्डुवाडी रेल्वे वर्कशॉपमध्ये १९८३ पासून नव्याने कर्मचाऱ्यांची बंद असलेली भरती श्री.साळवे साहेबांच्या अथक प्रयत्नाने ३८ वर्षानंतर त्यांच्याच काळात सुरू झाल्याने कुर्डुवाडीला पुनर्रवैभव प्राप्त करून देण्यास हातभार लागला आहे.*
*कुर्डुवाडी शहराचा खुंटलेला विकास नव्याने सुरू करण्यासाठी शांत,संयमी,मनमिळाऊ, कल्पक, प्रसिध्दी परान्मुख संजय साळवे साहेबांचे कार्य कुर्डुवाडीसाठी "माईलस्टोन" ठरल्याने त्यांना विविध संघटना,कर्मचारी आदींच्या वतीने भावपूर्ण निरोप देऊन पुढील कार्यास शुभेच्छाही देण्यात आल्या.*


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा