*तुळजापूर येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 'संविधान दिन' उत्साहात साजरा*
तुळजापूर:-येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाविद्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. अनिल शित्रे, उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, प्रा.रमेश नन्नवरे, सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले,प्रो. डॉ. गोविंद काळे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.सौ. शशिकला भालकरे, प्रा. डॉ.ब्रहस्पती वाघमारे,प्रा. अनिल पाटील, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर,नॅक समन्वयक प्रा. डॉ.प्रवीण भाले,प्रा.प्रमोद मुळे,प्रा.आर. पी. गायकवाड,प्रा. डॉ. मंदार गायकवाड यांची उपस्थिती होती.सूत्रसंचालन करताना प्रा. डॉ .शिवाजी जेटीथोर यांनी आजच्या दिवशी चे महत्त्व सांगितले,प्रास्ताविक करत असताना प्राचार्य डॉ. अनिल शित्रे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान या बद्दल माहिती सांगितली सर्वांनी संविधान अंगीकृत करावे असे आवाहन ही केले. यानंतर संविधान प्रास्ताविका सामूहिक वाचन करण्यात आले.प्रास्ताविका वाचन प्रा. डॉ. प्रवीण भाले यांनी केले.या कार्यक्रमाचे सूत्र संचलन प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. शशिकला भालकरे यांनी मानले. या कार्यक्रमाला सर्व प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी ,विध्यार्थी-विध्यार्थीनीं मोठ्या संख्खेने उपस्थित होते.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा