संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांना अभिवादन.
तुळजापूर,दि.२२, येथील श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित तुळजाभवानी महाविद्यालय तुळजापूर येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभारी प्राचार्य प्रो.डॉ.मेजर वाय ए डोके यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले, यावेळी ते म्हणाले की,श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक संकल्पक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांना संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांनी खंबीरपणे साथ दिली.सतत गरीब विद्यार्थ्यांना आईप्रमाणे जवळ घेऊन या मातेने त्यांना संस्कारित केले.वास्तविक श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या स्थापनेमध्ये संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या जिवनातील त्याग खुप मोठा आहे.एका आईच्या भूमिकेतून त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्यांला मदत करुन त्यांना संस्कारित करुन त्यांचे जीवन सार्थक केले.आजच्या पिढीला संस्थामाता सुशिलादेवी साळुंखे यांच्या जिवनातील त्याग समजणे ही काळाची गरज आहे असे अनमोल विचार त्यांनी यावेळी व्यक्त केले.याप्रसंगी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.यावेळी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सर्व योग्य ती खबरदारी घेऊन सदर कार्यक्रम संपन्न झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.व्ही एच चव्हाण यांनी तर आभार प्रा.ए.बी वसेकर यांनी मानले.सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस एम मणेर यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपन्न झाला.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा