Breaking

रविवार, १७ ऑक्टोबर, २०२१

उस्मानाबाद येथे पैगंबर जयंती निमित्त इस्लाम चे गाढे अभ्यासक "नौशाद उस्मान साहेब" यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.



उस्मानाबाद येथे पैगंबर जयंती निमित्त  इस्लाम चे गाढे अभ्यासक

 "नौशाद उस्मान साहेब" यांच्या  व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.



   सर्व  जगाला  शांती, एकात्मता ,सर्व धर्म  समभाव व विश्वबंधुत्वा चा संदेश देणारे प्रेषित हजरत "मोहम्मद "(स.अ)  यांच्या जयंती निमित्त  उस्मानाबाद  येथील मौलाना अबुल कलाम आझाद चॕरिटेबल  ट्रस्ट   ख्वाजानगर उस्मानाबाद संचलित  मौलाना अबुल कलाम आझाद उर्दु प्रायमरी  अँन्ड हायस्कुल  च्या वतीने व्याख्याना चा कार्यक्रम  आयोजित केला असुन  या कार्यक्रमा चे प्रमुख वक्ते  इस्लाम चे गाढे अभ्यासक

.  "नौशाद उस्मान साहेब "यांचे व्याख्यान  होणार असुन  कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी उस्मानाबाद चे नगराध्यक्ष मकरंदराजे निंबाळकर  तर प्रमुख पाहुणे म्हणून ,मध्यवर्ती  शिवजयंती समितीचे  अध्यक्ष   अशिश मोदानी,   प्रगती  सहकारी  पतसंस्थेचे  चेअरमन ,प्रशांत नानासाहेब  पाटील ,वीर भगतसिंग विद्यार्थी  परिषदेचे   मा.अध्यक्ष ,अग्निवेश शिंदे, शिवराज्याभिषेक  सोहळा समितीचे  अध्यक्ष  शशिकांत खुणे , अखिल भारतीय  मराठी साहित्य  संमेलन  अध्यक्ष   नितीन तावडे , कर्मवीर बाल मंदिर  प्राथमिक  विभाग चे  मुख्याध्यापक  डाॕ.रुपेशकुमार  जावळे , आयुर्वेदीक  महाविद्यालया चे  अधिष्ठता  डाॕ,एन , गंगासागरे  आदि मान्यवर उपस्थित राहणार असुन  सदर व्याख्यानाचा कार्यक्रम  सोमवार दि.18आॕक्टोबर २०२१ रोजी  सकाळी १०ते २ या वेळेत  भारत विद्यालय ,जुनी इमारत ,तालीम गल्ली  उस्मानाबाद येथे होणार असुन  या परिसरातील सर्व  हिंदु -मुस्लिम  बांधवानी  या व्याख्यानाचा आवश्य  लाभ घ्यावा  असे आवाहन ,संयोजक व मौलाना अबुल कलाम  आझाद चॕरिटेबल  ट्रस्ट  चे संस्थापक अध्यक्ष  मौलाना अलिमोद्दीन यांनी केले आहे .


प्रतिनिधी रुपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा