Breaking

गुरुवार, २१ ऑक्टोबर, २०२१

शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात मुदतवाढ द्यावी : संजय पाटील भीमानगरकर




शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यात मुदतवाढ द्यावी : संजय पाटील -भीमानगरकर


टेंभुर्णी प्रतिनिधी :- AJ 24 Taas News

माढा तालुक्यातील शेतकऱ्यांची वीज महामंडळाच्या वतीने बंद करण्यात आली शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी तगादा लावला जात आहे महावितरणने शेतकऱ्यांना वीज बिल भरण्यासाठी जानेवारी पर्यंत मुदतवाढ द्यावी अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हा परिषदेचे माजी कृषी व ज्पशुसंवर्धन  सभापती संजय पाटील यांनी टेंभुर्णी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

पुढे बोलताना ते म्हणाले की
सध्या उजनी धरण बॅक वॉटर व इतर ठिकाणी विदयुत महामंडळाने लाईट कपात केली आहे त्यामुळे या
भागातील सर्व शेतकरी अडचणीत आलेले आहेत गेल्या दोन वर्षापासून कोरोना
महामारीमुळे कोणत्याही शेतीमालाला योग्य भाव नाही त्यामुळे सर्व शेतकरी वर्ग अडचणीत आहे माढा तालुक्यातील साखर कारखाने चालू झालेले आहेत शेतकऱ्याचा ऊस जाऊन ऊस बिले येण्यास डिसेंबर ते जानेवारी महिना येणार आहे सध्या शेतकऱ्यांकडे कोणत्याही प्रकारची
पैशाची आवक नाही दिवाळी सण दहा दिवसांवर येऊन ठेपला आहे त्यामुळे कोणतीही पूर्वसूचना न देता अचानकपणे विज कपात करणे हे योग्य नाही शेतकरी सध्या हतबल
झालेला आहे त्यामुळे अचानक शेतकऱ्याची विज कपात करू नये अशी विनंती आहे ऊस
गेल्यावर सर्व शेतकरी विजबिल भरण्यास तयार आहेत जानेवारी महिन्या पर्यंत कोणत्याही
प्रकारची विज कपात करू नये, अन्यथा आपल्या विरोधात आक्रमक आदोलन करावे
लागेल याची जबाबदारी आपल्या खात्याची राहील
.असे ही संजय पाटील  भीमानगरकर यांनी सांगितले

यावेळी
सरपंच प्र पांडुरंग माने,नितीन मस्के,संतोष चव्हाण,तानाजी सलगर,मल्हारी गवळी,संदिप नागरे,कांतीलाल नगरे,सचिन चमरे. इत्यादी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा