*जन सेवा हीच ईश्वर सेवा माणून, मोफत आयुर्वेदिक शिबिर यशस्वी -नगराध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी*
*शिबिरात ३१३२ जणांची मोफत तपासणी*
तुळजापूर (दिनांक २४ प्रतिनिधी)
जनसेवा हीच ईशसेवा माणून श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट व विशाल (भैय्या) रोचकरी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुर्वेदिक न्युरोथेरेपी मेडिकल शिबिर यशस्वी झाले असून या शिबिराच्या माध्यमातून तुळजापूर शहरातील अनेक रुग्णांची सोय झाली आहे अशी भावना शिबिराच्या समारोपप्रसंगी अध्यक्ष सचिन (भैय्या) रोचकरी यांनी व्यक्त केले.
प्रमुख अतिथी म्हणून महंत वाकोजीबुवा , तहसीलदार सौदागर तांदळे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद, माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब (भाऊ) शिंदे बाळासाहेब (बापू) हंगरगेकर ,अनिल (दादा) शिंदे ,आनंद कुलकर्णी,नगरसेविका अश्विनी रोचकरी, तुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे, संचालक प्रा. धनंजय लोंढे ,माजी नगरसेवक अमर (दाजी) हंगरगेकर, राजेश शिंदे, श्याम प्रसाद लोहिया, डॉक्टर नरसिंह स्वामी मामडयाल, डॉक्टर नागेश आकेन, संतोष जाधव, वंदना मामड्याल, निशा आकेन, अश्विनी शिंदे, ज्योती सावंत, वैशाली धरणे, लक्ष्मी हंगरगेकर, आनंत सावंत उपस्थित होते.
प्रास्ताविक संयोजक विशाल (भैय्या) रोचकरी यांनी करून देताना शिबिरा पाठीमागे पार्श्वभुमी सांगून मिळालेल्या प्रतिसादाबद्दल सर्वांचे ऋण व्यक्त केले तसेच भविष्यात अनेक सामाजिक उपक्रमाचे आयोजन करून जास्तीत जास्त नागरिकांना विविध सुविधा उपलब्ध करून देण्याचा मानस व्यक्त केला.
त्यावेळेस तहसीलदार सौदागर तांदळे यांनी शिबिर आयोजकांचे अभिनंदन करून यापुढील कालावधीत प्रशासनातर्फे विविध शिबिरास आपण सहकार्य करू असे आश्वासन दिले.
यावेळी प्रा. लोंढे, विपिन शिंदे, डॉ. नरसिंह स्वामी, अॅड. शिवजी रोचकरी यांनी आपले विचार व्यक्त करून शिबिरास शुभेच्छा दिले.
सुत्रसंचलन महेंद्र कावरे सर यांनी केले
शिबिरातील लाभार्थी बापू मगर यांनी शिबिरात आपल्याला सर्व प्रकारचे उपचार मोफत केले असून त्याबद्दल संयोजकांचे आभार व्यक्त केले.
योग मास्टर विठ्ठल मामा जाधव यांनी दैनंदिन जीवनातील दिनार्चय, आहार व व्यायाम कसे असावे या विषयाचे सखोल असे मार्गदर्शन केले
या शिबिरात एकूण ३१३२ लाभार्थ्यांनी लाभ घेतला व आयोजकांचे आभार व्यक्त केले.
आभार निलेश रोचकरी यांनी मानले .
शिबिरात सहभागी सर्व डॉक्टर व कर्मचारी यांचा सत्कार विशाल (भैय्या) रोचकरी मित्र मंडळाच्या वतीने शाल, फेटा व देवीची प्रतिमा देऊन करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी आनंद सावंत, बाळासाहेब रोचकरी, नानासाहेब लोंढे ,बाबा खपले, विजय काकडे, किरण आवताडे ,विशाल गंगणे ,बाळू गुरव यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा