तुळजापूर प्रहार संघटनेच्या वतीने
गटविकास अधिकारी प्रशांतसिंह मरोड यांना निवेदन देण्यात आले.
निवेदनात तुळजापूर तालुक्यातील सर्व ग्रामपंचायती मधील अपंग व्यक्तींचा ५% निधी अपंग लाभार्थ्यांना खर्च करण्यात यावा
तुळजापूर तालुक्यातील आत्ता पर्यंत बर्याचशा ग्रामपंचायत मधील ५% निधी खर्च करण्यात आलेला नसून प्रहार संघटनेच्या माध्यमातून आपणास या अगोदर फोनद्वारे चर्चा करण्यात आली होती तर साहेबांनी आम्हास खर्च करू असे सांगण्यात आले होते परंतु आत्तापर्यंत अपंग व्यक्तीचा निधी खर्च केला जात नसून
तरी आपणास विनंती आहे की संपूर्ण ग्रामपंचायत कार्यालय मध्ये अपंग व्यक्तींना मिळणारा ५,,% निधी हा तात्काळ खर्च करण्यात यावा
ही नम्र विनंती
जर वरील निधी तात्काळ खर्च न झाल्यास प्रहार संघटनेच्या वतीने लोकशाही पद्धतीने पंचायत समिती कार्यालय तुळजापूर समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष
श्री शशिकांत मुळे यांनी केलेला आहे यावेळी प्रहार संघटनेचे तालुका अध्यक्ष श्री शशिकांत मुळे , तुळजापूर शहर अध्यक्ष श्री नागेश कुलकर्णी , सिद्राम तोडकर, गणपती कुंभार , नागनाथ मुळे , श्रीकांत कावरे , बालाजी धोत्रे , सौ सुनिता सूर्यवंशी , अलका इटकर आदी प्रहार कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतिनिधि रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा