Breaking

बुधवार, ८ सप्टेंबर, २०२१

परंडा तालुक्यात महापुराने मोठे नुकसान शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत



परंडा तालुक्यात महापुराने मोठे  नुकसान शेतकरी पंचनाम्याच्या प्रतीक्षेत


परंडा (दत्ता नरुटे)  भूम व परंडा तालुक्यात दि 4 रोजी झालेल्या अतिवृष्टी ने दोन्ही तालुक्यातील अनेक धरणे तुडूंब भरून सांडवे वाहू लागल्याने  परंडा तालुक्यातील चांदणी  ,खासापुरी धरणाखालील नद्यांना मोठा महापूर आल्याने नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसला  यामध्ये नदीकाठावरील ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले  काही ठिकाणी एकरी 25 ते 30  तर काही ठिकाणी पूर्णतः नुकसान झाले त्यामुळे याचा शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे तर  अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील काढणीस आलेले उडीद,मूग  पिकाला जागीच कोंब  आल्याने पूर्ण हंगामाचे नुकसान झाले आहे तर तुरी मध्ये पाणी गेल्याने तुर पीक जळून गेले आहे त्यामुळे प्रशासनाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई ध्यावी अशी मागणी नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांकडून होत आहे 



    चौकट 
   उभ्या उडीद पिकाला आले कोंब 
  मी  माझ्या शेतात यावर्षी उडीद पीक पेरले  पीक चांगले येण्यासाठी खूप मेहनत घेतली दोन वेळा खुरपनी केली ,खत टाकले पीक जोमदार आले आठ दिवसात काढणीस वेळ असताना अचानक नदीला पाणी आल्याने पूर्ण पीक दोन दिवस पाण्यात होते त्यामुळे शेंगा फुगून त्यातून आता कोंब आले आहेत त्यामुळे पूर्ण वर्ष भराचे नुकसान झाले आहे 
           जगनाथ गुडे शेतकरी 
आवार पिंपरी
नुकसान 100 टनाचे अन भरपाई 3 टनाची कशी शेती करायची 

  गेल्या वर्षी  प्रमाणे या वर्षी देखील  अचानक मोठा पाऊस झाल्याने  एका रात्रीत नदीला मोठा महापूर आल्याने माझ्या गट 2 मधील  साडे तीन एकर उसात महापुराने पाणी दोन राहिल्याने उसाचे मोठे नुकसान झाले असून मला प्रति एकर 25 या प्रमाणे माझे 90 ते 100 टन चे नुकसान झाले आहे परंतु शासनाकडून 5 टनाचे देखील भरपाई मिळत नाही 
                 रेवणनाथ नरुटे 
                 ऊस उत्पादक   
   
आज दि 8 रोजी ई पीक पाहणी माहिती संदर्भात तहसील कार्यालयात बैठक आयोजित केली होती या बैठकीत सर्व तलाठ्यांना  दि 9 सप्टेंबर पासून नुकसान झालेल्या क्षेत्राचे प्रत्यक्ष जाऊन पंचनामे करण्यास सांगितले  आहे  
             सुजित वाबळे 
तहसीलदार परंडा

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा