काटी गाव तीन दिवसांपासून काळ्याकुट्ट अंधारात; विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन शिक्षणाचे तिन-तेरा.
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील विद्युत पुरवठा शुक्रवार दि. 23 पासून ट्रान्सफॉर्मर जळाल्याने संपूर्ण काटी गाव, काटी विद्युत उपकेंद्रावर अवलंबून असणारे खुंटेवाडी, वाणेवाडी, नरसिंह तांडा या गावात काळ्याभोर अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. काटी येथील विद्युत उपकेंद्रात हा ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आला असून या ट्रान्सफॉर्मरुन काटीसह वाणेवाडी, खुंटेवाडी, नरसिंह तांडा या ठिकाणी वीजपुरवठा पुरवला जातो. हा ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध होत नसल्याने गावात आठवडाभर विद्युत पुरवठा येणार नाही अशी चर्चा ग्रामस्थांमधून व्यक्त केली जात आहे. सध्या काटी गाव काळ्याकुट्ट अंधारात बुडाले आहे. याचा फटका ग्रामस्थांना साेसावा लागत आहे. या प्रश्नाकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज यानिमित्ताने व्यक्त केली जाऊ लागली आहे. विद्युत महावितरणचे अभियंता कावरे यांच्याशी आमच्या प्रतिनिधीनी संपर्क साधला असता नवीन ट्रान्सफॉर्मर सध्या उपलब्ध नसल्याने पर्यायी व्यवस्था करण्याचे काम सुरू असून उद्या रविवारी दुपारपर्यंत विद्युत पुरवठा सुरळीत सुरु होईल असे सांगितले.
चौकट.....
तीन दिवसांत पासून वीजपुरवठा बंद असल्याने मोबाईलच्या बॅटऱ्या डिस्चार्ज झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणाचे तीन-तिरा वाजले आहेत. मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे नागरिकांचा एकमेकांशी संपर्क तुटला आहे.दळण, पाण्याची गैरसोय होत आहे. शिवाय घरातील कोणतेच विद्युत उपकरण चालवता येत नाहीत. नियमित वीजबिल भरणा करणाऱ्यांनाही वेळेवर वीज मिळत नसल्याने अंधारात राहावे लागत आहे.अबालवृध्दांना विद्युत पुरवठा बंद असल्याने त्रास सोसावा लागत आहे.
अहमद पठाण ग्रामस्थ काटी
रविवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होईल....
अभियंता कावरे
काटी गावातील ट्रान्सफार्मर बंद पडला असून नवीन ट्रान्सफॉर्मर तात्काळ उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय लक्षात घेऊन पर्यायी व्यवस्था करण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू असून उद्या रविवारी दुपारपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल
अभियंता कावरे माळुंब्रा सबस्टेशन.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापुर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा