Breaking

बुधवार, १ सप्टेंबर, २०२१

भरदिवसा जबरी चोरी करणारे बेंबळे , माळेगाव येथील तीन आरोपी जेरबंद* *टेंभुर्णी पोलिसांची कामगिरी*


*भरदिवसा जबरी चोरी करणारे बेंबळे , माळेगाव येथील तीन आरोपी जेरबंद*

*टेंभुर्णी पोलिसांची कामगिरी*

टेंभुर्णी प्रतिनिधी
भरदिवसा चोरी करून दहशत माजवू पाहणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात टेंभुर्णी पोलीस स्टेशन ला यश आले असून. तीन आरोपींना या प्रकरणी अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून ११२००/- व तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
  नागनाथ सुनील कोडक,सोमनाथ हनुमंत शिंदे,तेजस नागेश पवार असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. 31 ऑगस्ट रोजी आरोपीनी संगनमत करून बेंबळे ता माढा येथील महिला बचत गटाची रक्कम घेऊन माळेगाव कडे निघालेल्या एका इसमास मिटकलवाडी चौकात  विना नंबरच्या मोटरसायकलवर येऊन पाईपने मारहाण करून त्याच्याकडे असलेली रोख रक्कम २८८००\-रु व एक टॅब तसेच बायोमेट्रिक मशीन असे एकूण ३९८००\- रुपये किंमतीचा मुद्देमाल असलेली बॅग घेऊन चोरटे पसार झाले होते.
चोरट्यांनी मारहाण करून पैसे घेऊन गेल्यानंतर फिर्यादी सुरज संजय वाघमारे रा कुर्डूवाडी यांनी टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे घटनेची माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल होऊन पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे कडील गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलिस उपनिरीक्षक पी.व्ही. काशीद पोलीस शिपाई बाळराजे घाडगे व पोलीस शिपाई तुकाराम माने देशमुख यांनी मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे सदर प्रकरणाचा लगेच तपास करत माळेगाव ता. माढा येथील नागनाथ सुनील कोडक यास ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने त्याचे दोन साथीदार सोमनाथ हनुमंत शिंदे व तेजस नागेश पवार दोघे राहणार बेंबळे तालुका माढा यांच्यासोबत मिळून सदर गुन्हा केल्याची कबुली. वरील आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून एकूण गेल्या मालमत्ते पैकी ११२००\- रुपये व तीन मोबाईल हस्तगत करण्यात आले आहेत.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पी व्ही काशीद हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा