माहिती अधिकार पोलिस मित्रच्या वतीने कोरोना योद्धांचा सन्मान
वडूज प्रतिनिधी / शरद कदम
आंतरराष्ट्रीय मानवधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु.एन. न्युज २४ संलग्न असलेल्या माहिती अधिकार, पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेना यांच्या वतीने वडूज ता. खटाव येथील कोरोना काळात उल्लेखनीय काम केलेल्या अधिकारी, पदाधिकारी व पत्रकारांचा सन्मानपत्र देऊन कोरोना योध्दा म्हणून गौरव करण्यात आला. यावेळी पोलिस मित्र राजदूत संघटनेच्या महाराष्ट्र राज्य कार्यध्यक्षा शारदा भस्मे, संघटक सविता सांळुखे, जिल्हाध्यक्षा सलमा डांगे, माळशिरस तालुकाध्यक्षा जयश्री मोहिते, संगिता पवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी प्रांताधिकारी जनार्दन कासार, तहसिलदार किरण जमदाडे, पत्रकार धनंजय क्षीरसागर, आयाज मुल्ला, शरद कदम, मुन्ना मुल्ला, आकाश यादव, नितीन राऊत, समीर तांबोळी, दत्ता इनामदार या पत्रकारांचा तर आदिवासी महिला आघाडीच्या राज्यध्यक्षा राणी शिंदे, शिवसेनेच्या जिल्हा संघटक राणी काळे, मानवी हक्क अभियान महिला आघाडी अध्यक्षा शबाना मुल्ला, आशा सेविका योगिता काळे यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जे के काळे यांनी केले तर आभार उमाजी कुकले यांनी मानले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा