Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

कायदा आणि माणूसकीची सांगड घालणारे पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रेंची "पंढरीचरणी" बदली...हळहळला कुर्डुवाडी परिसर...* *गुन्हे डिटेक्ट करण्यात केंद्रेंचा हातखंडा... निष्क्रिय डोंगरेच्या काळात राखली खाकीची इभ्रत...* *डोंगरेचा मालामाल आडली बोराडे हवालदाराचीही उचलबांगडी...*


*कायदा आणि माणूसकीची सांगड घालणारे पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रेंची "पंढरीचरणी" बदली...हळहळला कुर्डुवाडी परिसर...*

     *एक डिटेक्ट करण्यात केंद्रेंचा हातखंडा... निष्क्रिय डोंगरेच्या काळात राखली खाकीची इभ्रत...*


    *डोंगरेचा मालामाल आडली बोराडे हवालदाराचीही उचलबांगडी...*


*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे(पत्रकार)यांजकडून...*

    *कुर्डुवाडी पोलिस ठाण्याचे प्रभारी पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांची पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात बदली झाल्याने त्यांच्या कार्यतत्परतेमुळे  परिसरातील नागरिकांत हळहळ व्यक्त केली जात आहे.*


      *सव्वा तीन वर्षांपूर्वी कुर्डुवाडी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला होता.आपल्या कार्यकाळात त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मानवतेच्या दृष्टिकोनातून माणूसकीचीही संयमी सांगड घालून खाकीची इभ्रत अबाधित राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.*

     *गेल्या सव्वा दोन वर्षांपूर्वी निष्क्रिय पोलिस निरीक्षकाच्या हडेलहप्पी कारभारामुळे पोलिस खात्यासमोर बेइज्जतीचे डोंगर पोलिस खात्याची इभ्रतच वारंवार वेशीवर टांगली जात होती.एवढेच नव्हे तर मोकाट गुन्हेगारांमुळे भरदिवसा व्यापा-यावर गोळीबाराने गॅगवारही सुरू झाले होते.*
     *गेल्या वर्षी तर पोलीस खात्याच्या खाकीवर हल्ला करून पोलीस खात्याची इभ्रतच वेशीवर टांगल्याने पोलिस अधीक्षक मॅडम पुढे ज्येष्ठ पत्रकारांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कैफीयत मांडली होती.त्यानंतर त्यांनी दखल घेऊन बेजोड"डोंगरे"चा डोंगर हटविला."गोरख" धंद्याच्या अधिका-यांलाही हेडक्वार्टर दाखवून दिले गेले.*
     *परंतु अशा काळात व कोरोनाच्या संकटात सहायक पोलिस निरीक्षक चिमणाजी केंद्रे कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी जातीने लक्ष देत होते.कुर्डुवाडी मुख्य पोलिस अधिकारी आयत्या बिळात नागोबा नागोबा सारखे डुलणारे डोंगरेच्या अंकीतील खून,मारामा-या,रोड राॅबरी, खंडणी, गोळीबार आदी सर्व गुन्ह्यांचे डिटेक्शन करण्याचें सोडले नाही.शंभर टक्के गुन्हे केंद्रे साहेबांनी त्यांनीच डिटेक्ट केलेत.*

      *नागरिकांचा असंतोष, पोलिस ठाण्यावर मालामाल डोंगरेच्या वागणुकीचा निषेध मोर्चा,डोगरेना मागावा लागलेला माफीनामा, पोलिस खात्यातच सुरू झालेली मालामाल बेदीलीच्या काळातही केंद्रे साहेबांनी पोलिस खात्याची इभ्रत राखण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली.*
    *साधारणपणे वर्ष दोन वर्षात अधिका-यांच्या बदल्या होतात.बदली ही अधिका-यांच्या पाचवीलाच पुजलेली.पण माणूसकीची सांगड,क्रिडा,कला,अध्यात्म यातही पारंगत असणारे कार्यतत्पर केंद्रे साहेबांच्या कार्यकुशलतेमुळे सव्वा तीन वर्षे या ठाण्यात राहून त्यांनी एक उच्चाकच स्थापला आहे.त्यांच्या बदलीमुळे कुर्डुवाडी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.*
    *केंद्रे साहेबांच्या जागी नव्याने सहायक पोलिस निरीक्षक म्हणून व्ही.व्ही.बोधे यांनी कार्यभार स्वीकारला असून त्यांच्या नावाप्रमाणे विक्रमी, विजयी कारभाराची नागरिकांची अपेक्षा.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा