Breaking

गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

कविता स्पर्धेत श्रीगोंद्याचा अक्षय कोथिंबीरे महाराष्टात पहिला ..



कविता स्पर्धेत श्रीगोंद्याचा  अक्षय कोथिंबीरे महाराष्टात पहिला ..

श्रीगोंदा-नितीन रोही,

साहित्यिक उपक्रम म्हंटला की त्यामध्ये स्पर्धा ही येतेच. त्याचप्रकारे हिंद-मराठी चॅनलतर्फे संपुर्ण जगातल्या नवकवींसाठी 'काव्यगंध' स्वरचित काव्यसादरीकरण स्पर्धा  ही स्पर्धा शनिवारी २६ जून २०२१ रोजी आयोजित करण्यात आली होती.
स्पर्धेमध्ये सहभाग घेण्याची अंतिम तारीख २० जुलै असल्यामुळे सर्व स्पर्धकांनी वेळेच्या आत व्हिडिओ देऊन उत्तम प्रतिसाद दिला. तसेच या स्पर्धेमध्ये *भरतातूनच नाही तर, फ्रान्स, ऑस्ट्रेलियातूनही स्पर्धकांचा सहभाग असल्याने ही स्पर्धा अणखीच सर्वांच्या मनावर एक वेगळेच चित्र रेखाटून बसली आहे*. 'काव्यगंध' या स्पर्धेमध्ये संपूर्ण भारत देशातून ऐकून ११८ स्पर्धकांचा सहभाग लाभला असून, दिनांक ३० जुलै रोजी सगळ्या व्हिडिओ प्रेक्षकपसंती साठी सोशल मीडियावर अपलोड करण्यात आल्या. 
त्याचबरोबर 'काव्यगंध' या संपूर्ण स्पर्धेचे परीक्षण वरिष्ठ साहित्यिक व पत्रकार डॉ. रमेश यादव आणि प्रसिद्ध साहित्यिका डॉ पल्लवी बनसोडे-परुळेकर यांनी केले.
अक्षय कोथिंबीरे याचे श्रीगोंदा तालुक्या सह सर्वत्र कौतुक होत आहे.

चौकट,

हिंद मराठी आयोजित काव्यगंध स्पर्धेमध्ये संपूर्ण भारतासह विदेशातुन सहभाग झालेल्या स्पर्धकांमधून अक्षय कोथिंबीरे ने पटकावला प्रथम क्रमांक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा