तुळजापूर येथे यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात शोकसभा*
तुळजापूर :- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालया मध्ये कै. सि.ना. आलुरे गुरुजी यांना श्रद्धांजली अर्पण करण्या साठी शोकसभे चे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास बोरगावकर यांची उपस्तिथी होती. या वेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. अनिल शित्रे उपप्रचार्य डॉ. नरसिंग जाधव, कनिष्ठ महाविद्यालय उपप्रचार्य प्रा. रमेश नन्नवरे ,सिनेट सदस्य प्रा. संभाजी भोसले, प्रो. गोविंद काळे,सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांची उपस्तिथी होती.
प्रारंभी कै.सि. ना.आलूरे गुरुजी यांच्या प्रतिमेचे पुजन उल्हास दादा बोरगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर सर्वांनी शोक व्यक्त करत आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी प्रा संभाजी भोसले यांनी गुरुजींचे क्रीडा आणि शैक्षणिक विचार सांगितले, प्रा. रमेश नन्नवरे यांनी गुरुजी सारखे शिक्षण दान करावे हे सांगितले सिनेट सदस्य प्रो. डॉ।गोविंद काळे यांनी गुरुजी सारखे चारित्र्य सम्पन्न असावे हे विचार मांडले,प्राचार्य डॉ. शित्रे यांनी गुरुजींचा एक -एक गुण घेतला तरी जीवन यशस्वी होते असे मत व्यक्त केले. शेवटी उल्हास दादा बोरगावकर यांनी गुरुजींच्या आठवणींना उजाळा देत गुरुजींची शिकवण ही शिक्षण प्रसाराची होती ती अंगी बाळगून सर्वांनी त्यांचा विचार ,आदर्श पुढे न्यावा हिच त्यांना खरी श्रद्धांजली असेल असे प्रतिपादन केले.या शोकसभे साठी सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर, न्याक समन्वयक प्रा.डॉ. प्रवीण भाले,प्रा. डॉ. अशोक कदम, प्रो. डॉ.सुरेंद्र मोरे, प्रा.डॉ. अंबादास बिराजदार,प्रा. श्रीरंग लोखंडे, प्रा. डॉ शशिकला भालकरे ,डॉ. मंदार गायकवाड,राजू बनसोडे, महादेव जाधव सर्व प्राध्यापक ,शिक्षक ,शिक्षकेत्तर कर्मचारी यांची उपस्तिथी होती.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा