धकटवाडी सरपंचपदी मोहन जाधव तर उपसरपंचपदी मोनाली माने.
वडूज प्रतिनिधी /शरद कदम
धकटवाडी ता.खटाव येथील ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडी जाहीर झाल्या होत्या. या निवडीमध्ये सरपंचपदी मोहन बंडू जाधव तर उपसरपंचपदी मोनाली हिंदूराव माने यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पार्टी समझोत्यानुसार मावळते सरपंच कृष्णा रंगु माने व उपसरपंच मोहन बंडू जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यानंतर सरपंच, उपसरपंच निवड जाहीर झाली. सरपंच पदासाठी मोहन बंडू जाधव यांना सूचक म्हणून शारदा मारूती जाधव तर उपसरपंचपदासाठी मोनाली हिंदूराव माने यांना संतोष अर्जुन जाधव यांनी सूचक म्हणून नाव सुचविले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जी आर कुलकर्णी यांनी काम पाहिले. यावेळी सदस्या सुनंदा रामचंद्र जाधव, जेष्ठ कार्यकर्ते नारायण माने, ग्रामसेवक एच बी पखाले, रामदास निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
सरपंच, उपसरपंच निवड झालेनंतर सरपंच श्री जाधव म्हणाले की, सर्वांना बरोबर घेऊन गावच्या विकासाच्या दृष्टीने विकासात्मक काम करणार असून आपणही सर्वांनी सहकार्याची भूमिका ठेवावी असे मत व्यक्त केले. यावेळी लक्ष्मण जाधव, अर्जुन जाधव, किसन माने, जनार्दन जाधव, व्यंकटराव माने, शिवाजी निंबाळकर, नंदकुमार जाधव, शरद जाधव, पोपट जाधव, अजय जाधव, भगवान जाधव, दत्तात्रय माने, विजय महाडिक, किसन जाधव, अरूण माने, संतोष माने, सचिन माने, भिमराव जाधव, लक्ष्मण काटकर आदिसह ग्रामस्थ यांनी सरपंच, उपसरपंच यांचे अभिनंदन केले.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा