Breaking

शुक्रवार, ६ ऑगस्ट, २०२१

टेंभुर्णी भर दिवसा व्यापाऱ्याच्या घरामध्ये चोरी४ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास


टेंभुर्णी भर दिवसा व्यापाऱ्याच्या घरामध्ये चोरी
४ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास

टेंभुर्णी प्रतिनिधी
टेंभुर्णी तालुका माढा येथील प्रसिद्ध कापड व्यापारी वीरकुमार गजकुमार शहा (वय66) यांच्या कुर्डूवाडी रस्त्यावरील ॠषभ अपार्टमेंटमधील फ्लॅटचे कुलूप तोडून घरात प्रवेश करून ४ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे.
याबाबत टेंभुर्णी पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की विरकुमार गजकुमार शहा हे टेंभुर्णी-कुर्डूवाडी रस्त्यावर ऋषभ आपार्टमेंट मधील फ्लॅटमध्ये पत्नी व मुलीसह राहतात. गत 14 दिवसापूर्वी वीरकुमार शहा यांच्या मुलीचे निधन झाल्याने ते त्यांचे लहान भाऊ संजय शहा यांच्याकडे राहण्यास गेले होते. त्यादरम्यान वीरकुमार शहा यांचे दररोज फ्लॅटवर येणे-जाणे होते. बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास वीरकुमार शहा व त्यांच्या पत्नी हे दोघेजण कपडे आणण्यासाठी फ्लॅटवर गेले होते व त्यानंतर परत ते भाऊ संजय शहा यांच्या घरी आले. नंतर सायंकाळी ६ वाजता ते दोघे आणखी काही कपडे आणण्यासाठी फ्लॅटवर गेले असता, त्यांना फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडल्याचे निदर्शनात आले. तसेच त्यांनी फ्लॅटमध्ये जाऊन पाहिले असता बेडरूममधील साहित्य अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. बेडरूममध्ये असणाऱ्या लोखंडी कपाटाचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी त्यामधील १ लाख५० हजार रुपये किंमतीच्या ५ तोळ्याच्या दोन पाटल्या, ६० हजार रुपये किंमतीचे २ सोन्याचे नेकलेस, ७५  हजार रुपये किंमतीचे अडीच तोळ्याची सोन्याची साखळी, ४५ हजार रुपये किंमतीची दीड तोळे सोन्याची साखळी, ३०हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र, ३० हजार रुपये किंमतीच्या एक तोळाच्या ४ लहान अंगठ्या, २४ हजार रुपये किंमतीचे 8 ग्रॅम सोन्याची कानातील फुले, 9 हजार रुपये किंमतीचे तीन ग्रॅम सोन्याचे वेल, १५ हजार रुपये किंमतीची कानातील डायमंडची फुले,  १२ हजार रुपये किंमतीचे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील दागिने असा एकूण चार लाख 65 हजार रुपये किमतीचा तेवढेच अज्ञात चोरट्यांनी लंपास केला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ विशाल हिरे व टेंभुर्णी चे प्रभारी सपोनि सुनील जाधव यांनी भेट दिली असून. याठिकाणी श्वानपथक व ठसे तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा अधिक तपास सपोनि अमित शितोळे हे करीत आहेत

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा